ठाणे - ठाण्यात ३१ डिसेंबर रोजी गुन्हेगारी प्रवृत्तीचे व समाजकंटक यांनी शिरकाव करू नये व गुन्हेगारांवर वचक बसावी यासाठी ठाणे पोलिसांनी ऑल आऊट ऑपरेशनची ( ( All out operation of Thane police ) सुरुवात केली आहे. या ऑपरेशनमध्ये ठाणे पोलीस आयुक्तालयातील सर्वच पोलीस रस्त्यावर उतरून कारवाई करत आहेत. ठाण्यात जवळपास १,७०० पोलिसांनी अशीच मोहिम ( 1700 police took part in operation ) राबविली आहे. या मोहिमेत एका रात्रीत फक्त पाच तासात 148 आरोपींना गजाआड ( 148 accused arrest in Thane ) करण्यात आले आहे.
ठाणे पोलिसांनी अटक केलेल्या 148 आरोपींमध्ये हद्दपार व रेकॉर्डवरील फरार आरोपींचा ( Thane Police arrests 148 accused ) समावेश आहे. सध्या ड्रग्ज विक्री आणि सेवनाचे लोण सर्वत्र पसरू लागले आहे. अशा परिस्थितीत पोलिसांनी ऑल आऊट ऑपरेशनमध्ये एनडीपीएस ऍक्टनुसार सुमारे तब्बल 29 गुन्हे दाखल ( NDPA act on 29 cases in Thane ) करण्यात आले आहेत.
ठाण्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ऑल आऊट ऑपरेश ठाणे मुख्यालय भागात राबविण्यात आले. ठाणे पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाणे व गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या 10 पथकांनी 14 डिसेंबर रोजी रात्री हे ऑपरेशन केले. कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, म्हणून ठाणे पोलिसांनी उपद्रवी गुन्हेगारांची कुंडली बनविली आहे. पोलिसांनी हद्दपार व रेकॉर्डवरील गुन्हेगारांची धरपकड सुरू केली आहे. ऑल आऊट ऑपरेशन राबवून एकाच रात्रीत तब्बल विविध गुन्ह्यातीस १४८ गुन्हेगारांना गजाआड करण्यात आले आहे. हे ऑल आऊट ऑपरेशन ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आदी शहरात राबविण्यात आले. या कारवाई अंतर्गत ठाणे, कळवा, मुंब्रा, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, भिवंडी आदी परिसरातील महाविद्यालय परिसर, बंद कंपन्या, तलाव परिसर, रेल्वे ब्रिज, बस स्टॉप, पडक्या इमारती, निर्जन स्थळे, गुन्हेगारी वस्त्या, झोपडपट्टी आदी ठिकाणी पोलीस पथकाच्यावतीने गस्त घालण्यात आली. यावेळी अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. पाच तास सुरू असलेल्या या मोहिमेत रेकॉर्डवरील गुंड व सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली.
ऑपरेशन ऑल आऊट -
ऑपरेशन वेळी अवैध शस्त्र बाळगणाऱ्या 11 आरोपींना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच एकूण 11 हद्दपार गुंडांना व फरार आणि रेकॉर्डवरील 20 आरोपींना अटक करण्यात आली. तर चार आरोपींना जुगार कायद्यानुसार गजाआड करण्यात आले. त्याव्यतिरिक्त दारूबंदी कायद्यानुसार 61 गुन्हे दाखल करण्यात येऊन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्तचे अशोक मोराळे यांनी ( Thane police commissioner Ashok Morale on operation ) सांगितले.
हेही वाचा-धक्कादायक..! पैशांसाठी मित्राचे अपहरण करून बेदम मारहाण, तिघे अटकेत