ठाणे : शिवसेनेच्या फुटी नंतर आता आदित्य ठाकरे कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी शिवसंवाद यात्रा ( Shivsamvad Yatra ) सुरू केली आहे. आ आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) यांनी ठाणे जिल्ह्याकडे लक्ष दिल असून ठाण्यातून पुढे भिवंडीकडे गुरुवारी रवाना झाले होते. शिंदे गटाच्या बंडखोरी नंतर शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेत शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर शिवसेनेकडून पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर संघटन टिकून राहावं आणि संघटन बांधणीसाठी आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रेला सुरुवात केली आहे.
शिवसंवाद यात्रेची सुरवात भिवंडीपासून ( Bhiwandi ) होणार आहे. मात्र ठाण्यातील हद्दीत आदित्य ठाकरे यांचे ठाण्यातील शिवसैनिकांनी स्वागत केले . दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासास्थना बाहेर देखील शिवसैनिकांनी आदित्य ठाकरे यांची भेट घेतली आणि सत्कार केला . मात्र शिव संवाद यात्रा ठाण्यात का नाही असा सवाल उपस्थित होत आहे. ठाण्यात शिव संवाद यत्रा होणार का आणि शिव संवाद यात्रेला गर्दी होते का हे पाहणं महत्वाचं आहे.
एकनाथ शिंदे यांच्या घराच्या बाहेर थांबले आदित्य ठाकरे -
एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील घराच्या बाहेर आदित्य ठाकरे यांना भेटायला काही कार्यकर्ते थांबले होते. आदित्य ठाकरे यांनी यावेळी गाडी थांबवली कार्यकर्त्यांकडून फुले घेतली आणि गाडीतून न उतरताच भिवंडीकडे निघून गेले. दरम्यान सर्व सुरक्षा यंत्रणा अलर्ट होत्या. रस्त्यावर थांबलेले कार्यकर्ते देखील आदित्य ठाकरे यांनी गाडी थांबवल्याने खुश झाले.
हेही वाचा : Aditya Thackeray Aurangabad Visit: बंडखोर आमदार विरोधात आदित्य ठाकरे करणार सेनेचे शक्तिप्रदर्शन