ठाणे - कृषि कायद्याविरोधात देशभर आंदोलन सुरू असताना ठाण्यात आम आदमी पक्षाने आंदोलन करत काळा दिवस साजरा केला. या कायद्याला विरोध करण्यासाठी आज ठाण्यातील चिंतामणी चौक येथे आम आदमी पार्टीच्यावतीने निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकारच्या विरोधात काळे मास्क लावून तसेच काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले. हा कायदा हा शेतकऱ्यांच्या हिताचा नसल्याचा आरोप यावेळी आपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
नव्या कृषी कायद्या विरोधात ठाण्यात 'आप'ची निदर्शने - आम आदमी पार्टी
कृषी कायद्याविरोधात आज ठाण्यातील चिंतामणी चौक येथे आम आदमी पार्टीच्यावतीने निदर्शने करण्यात आली. हा कायदा हा शेतकऱ्यांच्या हिताचा नसल्याचा आरोप यावेळी आम आदमी पक्षाने केला.

कृषि बिला विरोधात ठाण्यात 'आप'ची निदर्शने