ETV Bharat / city

VIDEO : भलामोठा अजगर घरात शिरला अन्.... - Python news

भक्ष्याच्या शोधात भलामोठा अजगर घरात घुसल्याची घटना समोर आली आहे. अजगर घरात घुसल्याचे पाहून त्या कुटूंबाची एकच पळापळ झाली होती. ही घटना कल्याण - मलंगगड रोडवरील द्वारली पाडा परिसरात असलेल्या एका घरात घडली आहे.

Python
ठाण्यातील एका घरात शिरला अजगर
author img

By

Published : Nov 5, 2021, 9:16 PM IST

ठाणे - जंगल - शेती भागातून भक्ष्याच्या शोधात भलामोठा अजगर घरात घुसल्याची घटना समोर आली आहे. अजगर घरात घुसल्याचे पाहून त्या कुटूंबाची एकच पळापळ झाली होती. मात्र, सर्पमित्राच्या मदतीने त्या भल्यामोठ्या अजगराला शिताफीने पकडले. ही घटना कल्याण - मलंगगड रोडवरील द्वारली पाडा परिसरात असलेल्या एका घरात घडली आहे.

ठाण्यातील एका घरात शिरला अजगर

घराच्या एका कोपऱ्यात बसला होता दडून -

बाबासाहेब गोरे यांचे कल्याण - मलंग रोडवरील द्वारली पाडा या ठिकाणी वीटभट्टी आहे. त्या लगतच त्यांचे घर आहे. त्यातच काल दुपारच्या सुमारास या घरामध्ये मोठा अजगर घुसल्याचे त्यांनी पहिले. त्यामुळे त्यांनी तातडीने सर्पमित्र दत्ता बोबे यांना अजगरविषयी माहिती दिली. त्यानंतर सर्पमित्र दत्ता यांनी कल्याण पूर्वेत राहणारे मुंबई पोलीस दलातील कर्मचारी, सर्पमित्र मुरलीधर जाधव यांच्यासह मुंबई हायकोर्टमधील कुलदीप चिकनकर मानद पशु कल्याण अधिकारी, यांना माहिती दिली. माहिती मिळताच दोघेही घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी गोरे यांच्या घरामध्ये आठ फूट लांबीचा अजगर (Indian Rock Python) जातीचा अजगर घराच्या एका कोपऱयात आडोशाला दडून बसल्याचे त्यांना दिसला होता.

भक्ष्यासाठी पाच-सहा दिवसांपासून घराच्या आसपास -

विशेष म्हणजे, हा भलामोठा अजगर भक्ष्य शोधण्यासाठी गेल्या पाच-सहा दिवसांपासून गोरे यांच्या घराच्या आसपास त्यांना दिसत होता. मात्र, घराच्या बाजूलाच असलेल्या वनसदृश क्षेत्रांमध्ये निघून जात होता. पोलीस कर्मचारी, सर्पमित्र जाधव व चिखलकर यांनी त्या अजगराला सुरक्षित पकडून पुढील कार्यवाहीसाठी कल्याण वन विभाग यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले असून, आज या भल्यामोठ्या अजगराला वन कर्मचाऱ्यांच्या उपस्थित निर्सगाच्या सानिध्यात सोडून देत जीवदान दिले.

हेही वाचा - आर्यन खान प्रकरणातून मला हटवले नाही - एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंची प्रतिक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.