ETV Bharat / city

इमारतीचा भाग अंगावर कोसळून लग्नाच्या वाढदिवशीच पतीचा मृत्यू तर पत्नी गंभीर

तीन मजली इमारतीच्या पहिल्या मजल्याचा काही भाग कोसळली. यामध्ये बाजूला बैठ्या घरात रहाणाऱ्या पती पत्नींमध्ये पतीचा जागीच मृत्यू झाला. तर, पत्नी गंभीर जखमी झाली आहे. तीची प्रकृतीही चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना या दाम्पत्याच्या लग्नाच्या वाढदिवशीच घडली आहे.

author img

By

Published : Sep 18, 2022, 7:41 PM IST

Updated : Sep 18, 2022, 8:57 PM IST

इमारत कोसळली
इमारत कोसळली

ठाणे - तीन मजली इमारतीच्या पहिल्या मजल्याचा काही भाग कोसळली. यामध्ये बाजूला बैठ्या घरात रहाणाऱ्या पती पत्नींमध्ये पतीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना उल्हासनगर कॅम्प नंबर तीन, सेक्शन २२ परिसरात घडली आहे. गोपाळदास गाबरा (वय ६३) असे मृत्यू झालेल्या पतीचे नाव आहे. तर बरखा गाबरा ( वय ६०) असे गंभीर जखमी झालेल्या पत्नीचे नाव आहे.

तीन मजली इमारत कोसळली

इमारतीचा मलबा अंगावर पडल्याने यामध्ये दोघेही दबले - या इमारतीच्या पहिल्या मजल्याचा भाग कोसळला. त्यावेळी घरात पती- पत्नी लग्नाच्या वाढदिवसाची तयारी करत होते. दरम्यान, इमारतीचा काही भाग कोसळला त्यामध्ये दोघेही दबले गेले. या घटनेची माहिती मिळताच पालिका आयुक्त अजीज शेख यांनी अधिकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. यातील जखमींना उपचारासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान गोपाळदास यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अशी माहिती उल्हासनगर महापालिका प्रशासनाने दिली आहे.

१० वर्षात स्लॅब कोसळून ३५ पेक्षा अधिक जणांचा बळी - उदयोग नगरी म्हणून ओळख असलेल्या उल्हासनगर शहरात १९९२ ते ९५ दरम्यान रेतीवर बंदी असताना दगडाचा बारीक चुरा व वालवा रेतीपासून असंख्य इमारती उभारण्यात आल्या. त्याच इमारती नागरिकांच्या जीवावर उठल्याचे उघड होत आहे. निकृष्ट बांधकाम झालेल्या इमारतींचे स्लॅब कोसळून दरवर्षी अनेकांचा बळी जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून गेल्या १० वर्षात ३४ इमारतींचे स्लॅब कोसळून ३५ पेक्षा जास्त जणांचा बळी गेला आहे. तर हजारो नागरिक बेघर झाले आहेत. धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रश्न अद्याप निकाली न निघाल्याने नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. इमारत कोसळली की, राजकीय नेते, महापालिका व सरकार सहानुभूती दाखवते. त्यानंतर धोकादायक इमारतीबाबत काही एक निर्णय घेतला जात नसल्याची टीका होत आहे.

Last Updated : Sep 18, 2022, 8:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.