ETV Bharat / city

ठाण्यात कोरोना रुग्णालये पुन्हा फुल्ल; रुग्णसंख्या वाढत असल्याने 70 टक्के खाटा भरल्या - ठाण्यातील कोरोना रुग्णालयांची स्थिती

शहरातील कोरोनावर उपचार करणारे रुग्णालये 70 टक्के फुल्ल झाली असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. सद्यस्थितीत कोरोनाचा संसर्ग वाढला असला तरी जिल्हा प्रशासन आणि पालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे.

ठाणे
ठाणे
author img

By

Published : Mar 25, 2021, 8:12 PM IST

ठाणे - राज्यासह ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होत असून जिल्हा प्रशासन पुन्हा एकदा कामाला लागले आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असून हळूहळू ठाण्यातील पालिकेच्या रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्ये भरती सुरू झाली आहे. एकप्रकारे ही चिंतेची बाब असून आतापर्यंत शहरातील कोरोनावर उपचार करणारे रुग्णालये 70 टक्के फुल्ल झाली असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. सद्यस्थितीत कोरोनाचा संसर्ग वाढला असला तरी जिल्हा प्रशासन आणि पालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे.

ठाणे

राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार शहरात योग्य ती खबरदारी घेण्यात येत असली तरी मात्र शहरात रुग्ण वाढीची संख्या झपाट्याने वाढत आहे.
पालिका प्रशासन योग्य उपाययोजना करत आहे. रुग्णांची संख्या वाढत असून काळजी करण्याचे कारण नाही, प्रत्येक रुग्णाला उपचार मिळेल हा हेतू आमचा असून पालिकेने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. येत्या काही दिवसांत पार्किंग प्लाझा येथेही 1 हजार खाटांची व्यवस्था करण्यात येणार आहे. सध्या औषधे, खाटा आणि रुग्णवाहिका तसेच लसीची कसलीही कमतरता नाही तरी लोकांनी करोनाचे नियम पाळावे, असे आवाहन पालिका अधिकाऱ्यांनी ठाणेकरांना केले आहे.

खाटा कमी पडतील अशी भीती

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता नागरिकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये, यासाठी मार्गदर्शनाखाली पालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज असून महापालिका क्षेत्रात 4221 कोविड खाटांची क्षमता निर्माण करण्यात आली आहे. यामध्ये ठाणे महापलिकेचे ग्लोबल रुग्णालय हे 1 हजार खाटांचे असून त्यामध्ये अवघे 215 खाट शिल्लक आहेत. तर सिव्हिल रुग्णालयात 30 टक्के खाट रिकामे आहे. दरम्यान ठाण्यातील खासगी रुग्णालये देखील 60 टक्के बेड भरले आहेत. त्यामुळे एकप्रकारे चिंताजनक बाब समोर आली आहे.

अनेक रुग्ण घरीच

ठाणे शहरात एकीकडे रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे 80 टक्के रुग्ण गृह अलगीकरणात आहेत. ज्या रुग्णांना लक्षणे दिसून येत नाहीत, त्या रुग्णांना गृह अलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच प्रामुख्याने या रुग्णांमध्ये तरुण वर्गाचा जास्त समावेश असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. ज्यांना किरकोळ आजार आहेत, अशा ज्येष्ठ नागरिकांनाच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.