ETV Bharat / city

चॉकलेट व सौंदर्य प्रसाधनाने भरलेला टेम्पो, कंटेनर चोरीप्रकरणी 5 आरोपींना अटक - bhiwandi narpoli police

कंटेनर व टेम्पो चोरी प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या 48 तासांत छडा लावला आहे. यामधील पाच आरोपींसह चोरीस गेलेला 85 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

भिवंडी कंटेनर चोरी
भिवंडी कंटेनर चोरी
author img

By

Published : Aug 13, 2021, 7:05 PM IST

Updated : Aug 13, 2021, 7:12 PM IST

ठाणे - भिवंडी नारपोली पोलीस ठाणे क्षेत्रातील दापोडा व पूर्णा येथून चॉकलेट व सौंदर्य प्रसाधनाने भरलेले कंटेनर व टेम्पो चोरी प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या 48 तासांत छडा लावला आहे. यामधील पाच आरोपींसह चोरीस गेलेला 85 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. राजकुमार रामचंद्र पाल, शिवानंद अनिल पवार, विनायक मोहन जगताप अशी कंटेनर पळविणाऱ्या तिघा चोरट्यांची नावे आहेत. तर इम्तियाज लियाकतअली अन्सारी उर्फ पंजाबी व आजीदूर रहेमान मोहम्मद हरून अन्सारी हे चॉकलेटने भरलेला टेम्पो लंपास करणाऱ्या चोरट्यांची नावे आहेत.

बनावट चावीच्या मदतीने कंटेनर पळविला

पहिल्या घटनेत दापोडा येथील श्रीराम कंपाऊंड येथे गोदामातून कंटेनरमध्ये यॉर्क एक्स्पोर्ट, एस. एस. सोल्युशन, कनवर कान्व्हास, रिव्हॉल्युशन ब्युटीया या कंपनीचे टी शर्ट, स्वेटर, स्त्रियांचे कपडे व सौंदर्य प्रसाधन साहित्य भरून ठेवलेला असताना अज्ञात चोरट्यांनी बनावट चावीच्या मदतीने 76 लाख रुपये किंमतीचा माल व 5 लाख रुपयांचा कंटेनर घेऊन पोबारा केला होता.

चॉकलेट टेम्पो घेऊन चोरांचा पोबारा

दुसऱ्या गुन्ह्यात पूर्णा गावाच्या हद्दीत चॉकलेटचा 1 लाख 10 हजार रुपये किंमतीचा चॉकलेट व खाद्य सामुग्रीचा माल भरून ठेवलेला टेम्पो उभा करून ठेवला असता रात्रीच्या अंधारात तो अज्ञात चोरट्यांनी पळविल्याच्या घटना दोन दिवसात घडल्याने खळबळ उडाली होती.

आरोपी मुद्देमालासह जाळ्यात

नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकातील पोलीस उपनिरीक्षक राहुल व्हरकटे, पो. हवा. सोनवणे, सातपुते, नवले, जाधव, पाटील, सोनगिरे, बंडगर, माने, ताटे या पोलिसांनी चोरी झालेल्या ठिकाणच्या परिसरातील मोबाइल टॉवरवरून त्या परिसरात त्यावेळी कार्यरत मोबाइलचा तांत्रिक तपास करीत पहिल्या गुन्ह्यात राजकुमार रामचंद्र पाल, शिवानंद अनिल पवार, विनायक मोहन जगताप तिघे व्यवसायाने चालक असणाऱ्या आरोपींना अटक केली. तर दुसऱ्या गुन्ह्यात इम्तियाज लियाकतअली अन्सारी उर्फ पंजाबी व आजीदूर रहेमान मोहम्मद हरून अन्सारी हे टेम्पो घेऊन मालेगाव येथे पळून गेल्याची माहिती काढून पोलिसांनी सापळा रचून या दोन आरोपींना मालेगाव येथून ताब्यात घेतले आहे. या पाचही आरोपींकडून चोरीस गेलेले कंटेनर, टेम्पो व सर्व 85 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Last Updated : Aug 13, 2021, 7:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.