ETV Bharat / city

पाकिस्तानचा झेंडा जाळल्याप्रकरणी शिवसेनेच्या ४ पदाधिकाऱ्यांना तीन वर्षांनी अटक

अमरनाथ यात्रेकरूंवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केल्याच्या निषेधार्थ २०१७ मध्ये ४ शिवसैनिकांनी पाकिस्तानचा झेंडा जाळला होता. या प्रकरणी नवी मुबंई पोलिसांनी ४शिवसैनिकांना अटक केली आहे.

author img

By

Published : Mar 5, 2020, 7:49 PM IST

4-shiv-sena-officers-arrested-in-navi-mumbai-for-burning-pakistan-flag-after-3-years
2017ला पाकिस्तानचा झेंडा जाळल्याप्रकरणी नवी मुंबईत शिवसेनेच्या 4 पदाधिकाऱ्यांना तीन वर्षांनी अटक

नवी मुंबई - अमरनाथ यात्रेकरूंवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी 2017 मध्ये पाकिस्तानचा झेंडा वाशीमध्ये शिवाजी चौकात जाळला होता. या प्रकरणी चार शिवसैनिकांना अटक करण्यात आली आहे. तीन वर्ष जुन्या प्रकरणात वाशी पोलिसांनी कारवाई केली आहे.

हेही वाचा - 'भिवंडीतील आमदारांचा मेट्रोच्या नियोजित मार्गाला पाठिंबा केवळ रिलायन्सच्या फायद्यासाठी'

शिवसेना शहरप्रमुख विजय माने, उपशहर प्रमुख गणपत शेलार, संतोष मोरे, विभागप्रमुख समीर बागवान यांना आज (गुरुवार 5 मार्च) राहत्या घरातून अटक केले आहे. जुलै 2017 मध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर हल्ला केला होता. या घटनेचे देशभरात तीव्र पडसाद उमटले होते. या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ नवी मुंबईतील शिवसेना पदाधिकार्‍यांनी पाकिस्तानचा झेंडा 11 जुलै 2017 ला पाकिस्तानचा निषेध करत वाशीतील शिवाजी चौकात जाळला होता.

याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही घटना घडल्यानंतर पाच महिन्यांनी या चारही शिवसेना पदाधिकार्‍यांना अटकही झाली होती. त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांची जामिनावर मुक्तता झाली होती. मात्र, या घटनेला तीन वर्ष लोटल्यानंतर या प्रकरणी आता पुन्हा चारही शिवसैनिकांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा - मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातही एसआरए योजनेत ३०० चौरसफुटांचे घर - जितेंद्र आव्हाड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.