ETV Bharat / city

खळबळजनक : अंबरनाथ पोलीस ठाण्याला कोरोनाचा विळखा; गजाआड असलेल्या ४ आरोपींना कोरोनाची लागण

अंबरनाथ पोलीस ठाण्यातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांप्रमाणेच गजाआड असलेले चार आरोपी आणि अंबरनाथ पश्चिम भागात राहणारा एक सफाई कर्मचारी, असे पाच जण करोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. सध्या अंबरनाथमध्ये कोरोना रुग्णांची संख्या २२ वर पोहचली आहे.

Ambernath police station thane
अंबरनाथ पोलीस ठाणे
author img

By

Published : May 14, 2020, 8:52 PM IST

ठाणे - अंबरनाथ पोलीस ठाण्यात जगाआड असलेल्या चार आरोपींना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. खळबळजनक बाब म्हणजे यापूर्वीच अंबरनाथ पोलीस ठाण्यात तीन पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित झालेले आहेत. त्यामुळे आता हे चार आरोपी देखील कोरोना संक्रमित आढळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. सदर चारही आरोपींना न्यायालयाच्या परवानगीनंतर मुंबई येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले असून अंबरनाथमध्ये कोरोनाबाधितांची संख्या आता २२ वर पोहचली आहे.

अंबरनाथ पोलीस स्टेशनमध्ये गडाआड असलेल्या 4 आरोपींना कोरोनाची लागण...

हेही वाचा... धक्कादायक..! मुंबईत आणखी एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू

अंबरनाथ शहराच्या दोन्ही बाजूला असलेल्या बदलापूर आणि उल्हासनगर या शहरांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६९ आणि ७१ झाली आहे. असे असताना अंबरनाथ शहरात रुग्णांची संख्या कमी असल्याने समाधान व्यक्त केले जात होते. मात्र, मागील दोन ते तीन दिवसात अंबरनाथ शहरातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. एकीकडे शहरात मुंबई येथे अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेले कर्मचारी कोरोनासंक्रमित होत असताना दुसरीकडे शहरांतर्गत अंबरनाथ पोलीस ठाण्यातील कर्मचारी बाधित झाले आहेत.

अंबरनाथ पोलीस ठाण्यातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांप्रमाणेच गजाआड असलेले चार आरोपी आणि अंबरनाथ पश्चिम भागात राहणारा एक सफाई कर्मचारी, असे पाच जण कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. सध्या अंबरनाथमध्ये कोरोना रुग्णांची संख्या २२ वर पोहचली आहे.

सदर चारही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर खुन करण्याचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्यांना अटक करण्यात आली होती, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी दिली. मात्र, त्यांना न्यायालयात हजर करण्यापूर्वीच ते कोरोनाबाधित झाले आहेत. त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत, असेही त्यांनी सांगितले. या सर्व आरोपी रुग्णांना डॉक्टर आणि पोलीस संरक्षणात मुंबई येथील रुग्णालयात पाठवण्यात आले असून पोलीस ठाणे सॅनिटाईज करण्यात आले आहे.

हेही वाचा... लॉकडाऊनमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढले, कारण ऐकून व्हाल थक्क

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.