नवी मुंबई - वाशी सेक्टर 17 येथेजय जवान इमारतीच्या पाण्याच्या टाकीवर 20 वर्षीय तरुणी आत्महत्या करण्यासाठी चढली होती. याची माहिती वाशी पोलिसांना मिळताच पोलिसांनी अग्नीशमन दलाच्या मदतीने या मुलीला रेस्क्यू केले. ही तरुणी मनोरुग्ण असून यापूर्वी देखील तिने असे प्रयत्न केले आहेत.
त्यामुळे पुढील अनर्थ टळला-
या तरुणीची तब्बल एक तास समजूत काढण्यात आली. तरी देखील ही तरुणी ऐकण्यास तयार नव्हती. त्यानंतरन महिला पोलीस मानसी लाड यांनी तिला बोलण्यात अडकवून ठेवले. त्यानंतर पोलीस हवालदार दत्तात्रय रेंगटे आणि अमृत साळी यांनी शिताफीने या तरुणीला पकडले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
यापूर्वी पण आत्महत्येचा प्रयत्न-
ही तरुणी याच इमारतीमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहते. तिची मानसिक स्थिती ठीक नसल्याने तिने हा प्रकार केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या तरुणीने यापूर्वी पण आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. तिच्या मनोरुग्ण अवस्थेमुळे तिच्या आईने यापूर्वी आत्महत्या केलेली आहे. या धक्क्यामुळे वडील देखील वाशीतच तिच्यापासून वेगळे राहत आहेत.
हेही वाचा- कोरोना लसीबाबत प्रश्न उपस्थित करणे दुःखद - गिरिराज सिंह