ETV Bharat / city

Faucets Stolen In Thane: अशीही चोरी! चोरट्यांने केले तब्बल १६ नळ लंपास; ठाण्यातील घटना - पाण्याचे नळ चोरीला गेल्याची घटना घडली

चोरट्यांनी घरातील मौल्यवान वस्तू सोडून स्नानगृह, स्वच्छतागृह, आणि किचनमधील असे १६ नळ काढून लंपास केल्याची घटना घडली आहे. ही घटना डोंबिवली पश्चिमेकडील शिवनेरी सोसायटीत घडली आहे. याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात घरमालकाने नळ चोरीची तक्रार दाखल केली असून पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.

घरातून नळ चोरी
घरातून नळ चोरी
author img

By

Published : Aug 10, 2022, 8:39 PM IST

ठाणे - चोरट्यांनी घरातील मौल्यवान वस्तू सोडून स्नानगृह, स्वच्छतागृह, आणि किचनमधील असे १६ नळ काढून लंपास केल्याची घटना घडली आहे. ही घटना डोंबिवली पश्चिमेकडील शिवनेरी सोसायटीत घडली आहे. याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात घरमालकाने नळ चोरीची तक्रार दाखल केली असून पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.

३१ हजार किंमतीचे नळ लंपास - पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार किशोर भाऊसाहेब जोंधळे (वय ५५) डोंबिवली पश्चिम भागातील शिवनेरी सोसायटीत कुटूंबासह राहतात. जोंधळे कुटूंब २८ जुलै ते ७ ऑगस्ट यादरम्यान काही कामनित्ताने बाहेरगावी गेल्याने घराला कुलूप होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी घरी परतल्यानंतर त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप कोयंडा तुटल्याचे दिसताच त्यांना घरात चोरी झाल्याचा संशय आला. त्यानंतर घरात जाऊन पाहिले तर घरातील साहित्य चोरट्याने अस्ताव्यस्त फेकून दिले होते. तर जोंधळे यांची नजर घराच्या स्वच्छतागृह, स्नानगृह आणि किचनमध्ये लावलेल्या नळाकडे गेली असता, ३१ हजार किंमतीचे नळ चोरट्यांनी लंपास केल्याचे लक्षात आले.

नळ चोरल्याने पोलीसही आश्चर्यचकित - त्यानंतर किशोर यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली असता, त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून पोलीस उपनिरीक्षक मोरे यांनी चोरट्यांचा शोध सुरु केला. दुसरीकडे चोरट्याने घरात घुसून मौल्यवान वस्तू चोरण्या ऐवजी केवळ नळ चोरल्याने पोलीसही आश्चर्यचकित झाले असून चोरटे प्लंम्बर असल्याचा कयास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा - डॉ. पी वरवरा राव यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अखेर जामीन मंजूर; वाचा, कोण आहेत वरवरा राव

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.