ETV Bharat / city

Girl Dies While Playing Swing In Thane : खळबळजनक! झोका खेळताना ११ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू - इंदिरा गांधी रुग्णालय

ठाण्यात झोका खेळताना ११ वर्षीय मुलीचा गळफास लागून दुर्दैवी मृत्यू ( Girl Dies While Playing Swing ) झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. झोका खेळण्यासाठी घराच्या दरवाजात साडी बांधून झोका तयार केला. परंतू खेळत असताना झोक्याला पिळ बसला. गिरकी घेतली असता तो पिळ घट्ट बसल्याने मृत मूलीचा जीव गुदमरून तिचा दुर्दैवी अंत झाला.

Girl dies while playing swing
झोका खेळताना मुलीचा मृत्यू
author img

By

Published : Jul 27, 2022, 12:31 PM IST

ठाणे - घरात झोका खेळत असताना ११ वर्षीय मुलीला झोक्याचा गळफास लागून दुर्दैवी मृत्यू ( Girl Dies While Playing Swing ) झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी शहरातील भादवड भागात ( Bhadwad In Bhiwandi City ) असलेल्या पुंडलिक नगरमधील चाळीच्या घरात घडली आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंद करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. वर्षा असे दुदैवी मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.

झोका खेळताना मुलीचा मृत्यू

झोक्याला पिळ बसल्याने मृत्यू - मृत मुलगी आईवडील व पाच वर्षाचा भाऊ व दहा महिन्याची बहिणी सोबत भिवंडीतील भादवड परिसरात असलेल्या पुंडलिकनगरमधील एका चाळीतील घरात राहत होती. मृत मुलीचे वडील श्रीजन मोतीलाल गौतम व त्याची पत्नी असे दोघेही भिवंडी तालुक्यातील सोनाळे येथे मोलमजुरी करण्यासाठी असल्याने घरात मोठी मुलगी असलेल्या मृत वर्षाकडे ५ वर्षीय मुलगा व दहा महिन्याची मुलगी सांभाळण्याची जबाबदारी असे, असेच नेहमी प्रमाणे रविवारी मृतकचे आई वडील कामावर ( Parents at work ) गेले असता घरात असलेली मृतक वर्षांने शेजारी राहणाऱ्या मैत्रिणीसह झोका, झोका खेळण्यासाठी त्यांनी घराच्या दरवाजात साडी बांधून झोका तयार केला. परंतु यावर खेळत असताना झोक्याला पिळ देत गिरकी घेतली असता तो पिळ घट्ट बसल्याने वर्षाचा जीव गुदमरून त्यातच तिचा दुर्दैवी अंत झाला आहे. घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात ( Indira Gandhi Hospital ) रवाना केला.

एका ११ वर्षीय मुलीला प्राण गमवावे लागले - आई वडील कामावर गेलेले असल्याने घरात राहिलेल्या मुलीने विरंगुळा म्हणून साडीच्या साहाय्य्यने घरातच झोका बांधून मैत्रिणी सोबत खेळण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यावेळी लक्ष ठेवण्यास कोणी वडीलधारी व्यक्ती नसल्याने हकनाक एका ११ वर्षीय मुलीला आपला प्राण गमवावा लागल्याच्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा - Uddhav Thackeray : एकनाथ शिंदें यांनी वाईट पद्धतीने मुख्यमंत्री पद मिळविले- उद्धव ठाकरे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.