ठाणे : ठाणे जिल्ह्यातील (Thane District) ८ मोठी धरणे अजूनही काठोकाठ भरली नसली, तरी मात्र ठाणे, भिवंडी व मुंबई महानगरपालिकेचे उदंचन केंद्र असलेला पिसा धरण ओव्हरफ्लो झाला आहे. भातसा धरणाच्या जलाशयातून विमोचकाद्वारे नदीत सोडलेले पाणी पिसे येथे बंधारा बांधून, उदंचन पद्धतीने मूळ जलवाहिनीत सोडण्यात येते. तसेच शहापूर व भिवंडी ग्रामीण भागात सतत पडणाऱ्या पावसामुळे हा बंधारा गेल्या २४ तासापासून ओव्हरफ्लो झाला आहे. तर जिल्ह्यातील विविध तालुक्यात पाच दिवसात आतापर्यत १० पेक्षा जास्त नागरिकांचे बळी (10 civilians died due to rain) गेले आहेत.
पुराच्या प्रवाहमुळे नुकसान : गेल्या पाच दिवसात जिल्ह्यात सर्वच नद्यांना पूर आलाय. आणि खाडी भागात पुरासह दरड कोसळून आतापर्यत १० च्यावर नागरिकांनी आपला जीव गमावला लागल्याचे समोर आले आहे. तर अनेक मार्गासह लहान मोठ्या पुलाचे पुराच्या प्रवाहमुळे नुकसान झाले. तर काही प्रमुख मार्गावरील पुलांची युद्धपातळी स्तरावर दुरुस्ती करून वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत.
सखल भागातील रहिवाशांच्या घराचे पंचनामे होणार: एकीकडे जिल्ह्यात सतत ५ दिवस मुसळधार पावसामुळे सर्वच नद्यांना पूर आला होता. हेच पुराचे पाणी जिल्ह्यातील नागरिकांच्या घरात शिरून हजारो संसार उघड्यावर पडले आहे. मात्र शनिवारी पुराचे पाणी ओसरातच नागरिकांचे जनजीवन हळूहळू पूर्वपदावर आले. त्यामुळे रविवारपासून जिल्ह्यातील सखल भागात राहणाऱ्या नागरिकांच्या घराच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरु झाले आहे. यासाठी सर्वच स्थानिक तहसीलदारांनी तलाठी व महसूल कर्मचाऱ्यांना निर्देश दिल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा : Sipana River Flooded Due to Torrential Rains: मेळघाटात सिपना नदीला पूर; युवक नदीत वाहून गेल्याने खळबळ