ETV Bharat / city

सोलापुरात तहसीलदार, नायब तहसीलदारांनी केले लेखणी बंद आंदोलन; प्रशासकीय कामकाज ठप्प - सोलापूर तहसीलदार आंदोलन

महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना सोलापूर शाखेच्यावतीने शुक्रवारी एक दिवसाचे धरणे आंदोलन करत काळ्या फिती लावून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तहसीलदार आणि नायब तहसीलदारांनी आंदोलन केल्याने सोलापूर शहरासह जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय कामे रखडली होते

solapur Tehsildar agitation
सोलापुरात तहसीलदारांचे आंदोलन
author img

By

Published : Apr 1, 2022, 5:31 PM IST

Updated : Apr 1, 2022, 6:35 PM IST

सोलापूर - महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना सोलापूर शाखेच्यावतीने शुक्रवारी एक दिवसाचे धरणे आंदोलन करत काळ्या फिती लावून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तहसीलदार आणि नायब तहसीलदारांनी आंदोलन केल्याने सोलापूर शहरासह जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय कामे रखडली होते.10 वर्षांपासून या पदोन्नती रखडल्या असल्याने रखडलेल्या पदोन्नती ताबडतोब देण्यात याव्या, अशी प्रमुख मागणी यावेळी आंदोलनातील तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांनी केली.

सुशील बेल्हेकर - तहसीलदार

तहसीलदारांच्या या आहेत मागण्या - नायब तहसिलदार संवर्गाची सेवा जेष्ठता यादी प्रसिध्द करणे. तहसिलदार संवर्गाची सन 2011 पासूनची सेवा जेष्ठता यादी प्रसिध्द करणे. नायब तहसिलदार संवर्गातून तहसलिदार संवर्गात पदोन्नती करणे.तहसिलदार संवर्गातून उपजिल्हाधिकारी संवर्गात पदोन्नती करणे.नायब तहसिलदार व तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची कालबध्द पदोन्नती बाबतचे प्रलंबीत प्रस्ताव तात्काळ निकाली काढणे. परिविक्षाधीन नायब तहसिलदार व तहसिलदार यांचे परिविक्षाधीन कालावधी समाप्ती बाबतचे प्रस्ताव तात्काळ निकाली काढणे. नायब तहसिलदार व तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांचे स्थायित्व प्रमाणपत्राबाबतचे प्रस्ताव तात्काळ निकाली काढणे.नायब तहसिलदार व तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांचे प्रलंबीत सेवा जोड प्रस्ताव तात्काळ निकाली काढणे.सेवा निवृत्त नायब तहसिलदार व तहसिलदार यांचे प्रलंबीत सेवानिवृत्ती प्रकरणे व संबंधीत लाभ तात्काळ निकाली काढणे.महिला अधिकाऱ्यांचे बाबतीत महसूल विभाग वाटप करतांना प्राधान्यांने सोईचे ठिकाण देण्याबाबत सुधारणा करणे.या मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले.

आंदोलन मागे घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना - जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना संघटनेच्या वतीने यावेळी निवेदन देण्यात आले. यावेळी आपल्या पातळीवरील मागण्या चर्चेतून आणि समन्वयातून सोडवू आजचे काम बंद आंदोलन मागे घ्या अशा सूचना जिल्हाधिकारी शंभरकर यांनी संघटनेला केल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयासमोर 18 एप्रिलला आंदोलन करणार - संघटनेचे अध्यक्ष सुनील बेलेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट करत येत्या 18 एप्रिल रोजी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगितले.आंदोलनात सहा अध्यक्ष तहसीलदार अमोल कुंभार तहसीलदार, उपाध्यक्ष नायब तहसीलदार एस सी परदेशीमठ, रविकिरण कदम, प्रवीण घम, अभिजीत पाटील तहसीलदार जयवंत पाटील, स्वप्नील रावडे, बाळासाहेब शिरसट, सुनील शेरखाने, एन एस वाकसे, ए एम निराळी, मनोज क्षोत्री, व्ही पी साळुंखे,संजय मिनगुरकर, विजय कवडे, बी के बनसोडे, व्ही एस लोकरे, आर आर कदम,रामकृष्ण पुदाले, डी एम गायकवाड,शुभांगी जाधव, आरती दावडे, अभिजित जाधव हे तहसीलदार व नायब तहसीलदार उपस्थित होते.

Last Updated : Apr 1, 2022, 6:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.