ETV Bharat / city

राजू शेट्टींनी माढ्यातूनही निवडणूक लढवावी, स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची मागणी - सोलापूर

सोलापूर  जिल्ह्यातील साखर कारखानदारांना वठणीवर आणण्यासाठी शेट्टी यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.

राजू शेट्टी (संग्रहीत छायाचित्र)
author img

By

Published : Feb 28, 2019, 10:31 AM IST

Updated : Feb 28, 2019, 10:36 AM IST

सोलापूर- हातकणंगले मतदारसंघासोबतच राजू शेट्टी यांनी माढा लोकसभा मतदारसंघातूनदेखील निवडणूक लढवावी, अशी जोरदार मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सभा आयोजित करण्यात आली होती. भाषण सुरू असतानाच स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत, ही मागणी केली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पुण्यात होणार आहे. त्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर माढा लोकसभा मतदारसंघातील माळशिरस तालुक्यात असलेल्या वेळापूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांची भाषणे सुरू असतानाच उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केली. खासदार शेट्टी यांनी हातकणंगले मतदारसंघासोबतच माढा लोकसभा मतदारसंघातूनही निवडणूक लढवावी, असा ठराव करण्याची मागणी यावेळी करण्यात आ

सभेत घोषणा देताना कार्यकर्ते
ली.

खासदार राजू शेट्टी यांनी त्यांच्या मतदारसंघातील साखर कारखानदारांना वठणीवर आणले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीचे पैसे मिळवून देत शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी मागील अनेक वर्षापासून ते लढा देत आहेत. आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी माढ्यातून लढा सुरू करण्याची वेळ आलेली आहे. सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांना वठणीवर आणण्यासाठी शेट्टी यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत मतदारांनी स्वाभिमानीच्या पारड्यात मतं देऊन राष्ट्रवादीसमोर मोठे आव्हान उभे केले होते. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माढा लोकसभा मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विजयसिंह मोहिते पाटील यांचा २० हजार मतांच्या आतच विजय झाला होता. त्यावेळी सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानीकडून माढाची निवडणूक लढवली होती. मात्र, ते भाजपमध्ये गेल्यामुळे रविकांत तुपकर यांच्या नावाची चर्चा सुरू होती. तर रविकांत तुपकर बुलडाण्यातून निवडणूक लढवणार असल्यामुळे खुद्द राजू शेट्टी यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून उभे राहावे, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.

Intro:R_MH_SOL_01_28_RAJU_SHETTY_IN_MADHA_S_PAWAR

राजू शेट्टी यांनी माढा तूनही लढावे, स्वाभिमानी च्या कार्यकर्त्यांची जोरदार मागणी
सोलापूर-
हातकणंगले मतदारसंघात सोबतच राजू शेट्टी यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून देखील निवडणूक लढवावी अशी जोरदार मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी राजू शेट्टी यांनी माढ्यातून निवडणूक लढवावी यासाठी कार्यकर्त्यांनी भाषण सुरू असतानाच जोरदार घोषणा बाजी करत ही मागणी केली आहे.

Body:स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पुणे येथे होणार आहे त्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर माढा लोकसभा मतदारसंघातील माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेच्या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांची ची भाषणे सुरू असतानाच उपस्थित असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली यावेळी खासदार राजू शेट्टी यांनी हातकणंगले मतदारसंघात सोबतच म्हाडा लोकसभा मतदारसंघातून देखील निवडणूक लढवावी असा ठराव करा अशी मागणी यावेळी करण्यात आली खासदार राजू शेट्टी यांनी त्यांच्या मतदारसंघातील साखर कारखानदारांना वठणीवर आणतो ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीचे पैसे मिळवून देत शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी मागील अनेक वर्षापासून लढा देत आहेत आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी चा लढा माढ्यातून सुरू करण्याची वेळ आलेली आहे कारण राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा म्हणून सोलापूर जिल्हा पुढे आलेला आहे या जिल्ह्यातील साखर कारखानदारांना वठणीवर आणण्यासाठी खासदार राजू शेट्टी यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.
2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये महारा लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निवडणूक लढवली होती या निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी स्वाभिमानीच्या पारड्यात आपली मतं देऊन राष्ट्रवादी काँग्रेस समोर मोठे आव्हान उभे केले होते राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणाऱ्या माढा लोकसभा मतदारसंघात 2014 च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या विजयसिंह मोहिते पाटील यांचा वीस हजार मतांच्या आतच विजय झाला होता. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून महाराची निवडणूक लढवली होती मात्र सदाभाऊ खोत भाजपमध्ये गेल्यामुळे मनातून रविकांत तुपकर यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती मात्र रविकांत तुपकर हे बुलढाण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्यामुळे खुद्द राजू शेट्टी यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून उभे राहावे अशी कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे.

Conclusion:R_MH_SOL_01_28_RAJU_SHETTY_IN_MADHA_S_PAWAR
या नावाने व्हिडिओ FTP व पाठविलेला आहे....
Last Updated : Feb 28, 2019, 10:36 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.