सोलापूर - शेतकऱ्यांच्या विकासासाठी तीन कृषी कायदे आणले होते. छोट्या शेतकऱ्यांना आणखी ताकद मिळावी, अशी वर्षानुवर्षे मागणी होती. देशातील कृषी वैज्ञानिक शेतकरी संघटना यांच्याशी चर्चा केल्यानंतर आम्ही कायदे आणले. पण केंद्रीय कृषी कायद्यांचा विषय सुप्रीम कोर्टात गेला. आता आम्ही हे कायदे रद्द करत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. या घोषणेनंतर सोलापुरातील शेतकऱ्यांनी आणि शेतकरी संघटनांनी वेगवेगळ्या प्रकारे आनंद साजरा केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कार्यालयासमोर फटाके उडवून या निर्णयाचे स्वागत केले. मात्र कायदा रद्द केल्याचे नुसते घोषणा किंवा चॉकलेट नको, तर संसदेत कायदा पारित करून पारित केलेला कायदा रद्द करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनी केली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शुक्रवारी आनंद व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संदेश दिला, की तीन कृषी कायदे रद्द केल्याचा चॉकलेट नको, तर संसदेत पारित झालेले कायदे संसदेत रद्द झाले पाहिजे. सोमवारी लोकसभेचे विशेष अधिवेशन बोलावून हे तिन्ही कृषी कायदे रद्द करावे, अशी मागणी स्वाभिमानीच्या वतीने करण्यात आली आहे.
हेही वाचा - मोदींना विनंती करेल, शेतकऱ्यांना समजावून सांगून 'ते' तीन कायदे पुन्हा आणू : चंद्रकांत पाटील