ETV Bharat / city

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोलापूरच्या ग्रामीण भागात कडक निर्बंध

सध्या कोरोना रुग्णाची संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. बुधवारी दिवसभरात शहर आणि जिल्ह्यात 472 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. तर गुरुवारी पुन्हा 500 च्या वर रुग्ण आढळले आहेत. गुरुवारी तर तब्बल 500 हून अधिक कोरोनाचे रुग्ण शहर आणि जिल्ह्यात सापडले आहेत.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोलापूरच्या ग्रामीण भागात कडक निर्बंध
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोलापूरच्या ग्रामीण भागात कडक निर्बंध
author img

By

Published : Mar 25, 2021, 10:08 PM IST

सोलापूर - सध्या कोरोना रुग्णाची संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. बुधवारी दिवसभरात शहर आणि जिल्ह्यात 472 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. तर गुरुवारी पुन्हा 500 च्या वर रुग्ण आढळले आहेत. गुरुवारी तर तब्बल 500 हून अधिक कोरोनाचे रुग्ण शहर आणि जिल्ह्यात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊन लागणार का, अशी चर्चा सुरू होती. लॉकडाऊन न लावता कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी नियम अधिक कडक करण्याचा निर्णय झाला आहे. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक पाहता प्रशासनाला लॉकडाऊनचा निर्णय अद्याप तरी घेता येणार नाही, अशी परिस्थिती आहे. परंतु सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील निर्बंध अजून कडक केले आहेत. शहर जिल्ह्यातील सर्व दुकाने सकाळी सात ते सायंकाळी 7 पर्यंतच सुरू राहतील. हॉटेल परमिट रूम बियर बार हे सायंकाळी सात वाजता बंद होतील. विशेष म्हणजे शनिवार आणि रविवारी सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे.

अत्यावश्यक सेवांना मात्र सूट-

सोलापूरातील ग्रामीण भागातील अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, असे आदेशात नमूद आहे. मेडिकल किंवा वैद्यकीय सेवा, किराणा दुकाने, भाजीपाला हे मात्र शनिवार-रविवार सुरू राहतील. आठवडी बाजार व जनावर बाजार पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय झाला आहे. जिल्हाधिकारी यांनी गुरुवारी दुपारी नवीन आदेश काढून हे सर्व निर्बंध लागू केले आहेत .

धार्मिक स्थळांवर देखील निर्बंध-

जिल्ह्यातील सर्व मंदिरे, मस्जिद, चर्च आदी धार्मिक स्थळे हे सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहतील. पूजेसाठी किंवा नमाज अदा करण्यासाठी केवळ पाच लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे. पाच पेक्षा अधिक लोक धार्मिक स्थळांत आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे.

क्रीडा स्पर्धांवर देखील बंदी-

खेळाची मैदाने व्यायामासाठी मोकळी असतील. मात्र सामूहिक स्पर्धा कार्यक्रम भरता येणार नाहीत. जिम, व्यायामशाळा, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, खेळाची मैदाने, जलतरण तलाव, वैयक्तिक सरावासाठी सुरू राहतील. मात्र कोणतीही स्पर्धा घेण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जाहीर केले आहे. हा आदेश 31 मार्चपर्यंत लागू राहणार आहे. प्रतिबंधित क्षेत्रात सर्व प्रकारची आस्थापने, दुकाने, धार्मिक स्थळे, कार्यालय बंद ठेवावीत, असेही आदेशात नमूद केले आहे.

हेही वाचा- ...तर रश्मी शुक्ला यांच्यावर सरकार कारवाई का करत नाही - सुधीर मुनगंटीवार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.