सोलापूर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीदरम्यान तडीपार व्यक्ती सचिन उर्फ बॉबी संभाजी शिंदे (वय ३८, रा. आवसे वस्ती आमराई, सोलापूर) याला ताब्यात घेताना विरोध झाल्याची घटना घडली आहे. मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांची करडी नजर होती. सचिन शिंदे हा तडीपार असून मिरवणुकीत नाचत आहे, हे लक्षात येताच पोलिसांनी त्यास ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याने व त्यासोबत असलेल्या इतर व्यक्तींनी पोलिसांचा विरोध करत झटापट केली. याबाबत फौजदार चावडी पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - Dr. Babasaheb Ambedkar Jayanti : सोलापुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीला सुरुवात
सचिन उर्फ बॉबी संभाजी शिंदे यास पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर, १६ डिसेंबर २०२२ रोजीच्या आदेशान्वये सोलापूर शहर व जिल्ह्यातून २ वर्षांकरीता तडीपार केलेले आहे. तो मिरवणुकीत नाचत असल्याचे दिसताच पोलिसांनी त्याच्यावर कारवाईचा प्रयत्न केला. मात्र त्याने पोलिसांचा विरोध केला.
तडीपार व्यक्ती व त्याच्या नातेवाईकांची पोलिसांसोबत झटापट - सोलापुरातील नार्थकोट प्रशाला या ठिकाणी तडीपार असलेला सचिन उर्फ बॉबी शिंदे आढळून आला. त्यासोबत त्याचे नातेवाईक देखील होते. फौजदार चावडी पोलीस त्याला धरून पोलीस ठाण्याकडे घेऊन निघाले. बॉबीला कारवाईला घेऊन जाऊ नका, अशी हुज्जत घालून नातेवाईकांनी पोलिसांसोबत झटापट करण्यास सुरुवात केली. पोलिसांची शर्टाची गच्ची धरून ओढा ओढी करून चावा घेतला व शिवीगाळ करून आम्हाला सोड नाहीतर बघ, असे म्हणून दोन पोलिसांवर हल्ला केला.
फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - फौजदार चावडी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक रविराज शाम काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, सचिन ऊर्फ बॉबी संभाजी शिंदे, कीर्ती सचिन शिंदे, (दोघे रा. आवसे वस्ती आमराई , सोलापूर) सुलोचना दत्तात्रय शिंदे, दिक्षा अक्षय वाघमारे, गुड्डी दत्तात्रय शिंदे व इतर दोन अनोळखी पुरुषांविरोधात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास एपीआय विष्णू गायकवाड करत आहे.
हेही वाचा - Bhimsainik Stop Slogan Near Mosque : मशिदीवरील भोंग्याचा सोलापुरात आदर; अजान सुरू असताना घोषणाबाजी बंद