सोलापूर - महानगरपालिकेच्या स्थायी आणि परिवहन समितीच्या सभापतींची निवड पुन्हा एकदा महिनाभर लांबणीवर गेली आहे. स्थायी सदस्य व परिवहन सदस्य निवडीवेळी गटनेत्यानी वेगवेगळे नावे दिली होती. यावर एमआयएमच्या गटनेत्या पूनम बनसोडे यांनी सदस्य निवडीला कोर्टात आव्हान दिले होते. एमआयएमचा गटनेता कोण यावरून वाद निर्माण झाला होता. मागील आठवड्यात होणारी सभापती निवड प्रक्रिया पूढे ढकलली होती. आज सोमवारी ही सभापती निवड प्रक्रिया पार पडणार होती. पण शासनाने संपूर्ण स्थायी समिती आणि परिवहन समिती निलंबित केली आहे. आता सोलापूर पालिकेत पुन्हा एकदा स्थायी व परिवहन समितीत सदस्य नव्याने निवडले जाणार आहेत. त्यासाठी सभापती निवड प्रक्रिया एक महिनाभर लांबणीवर गेली आहे.
हेही वाचा - वाझे प्रकरणात शिवसेना युवानेत्याचे नाव; कोण आहेत वरूण सरदेसाई?
एका आदेशनव्ये स्थायी समिती व परिवहन समिती निलंबित-
राज्य शासनाने सोलापूर महानगरपालिकेची 16 सदस्यीय स्थायी समिती व 12 सदस्यीय परिवहन समिती निलंबित केली आहे. गटनेते पदाच्या वादातून थेट दोन्ही समित्या निलंबित केल्या आहेत. एमआयएमचा दोन गटनेत्यांनी मागील आठवड्यात दोन सदस्यांची नावे महापौर यांच्याकडे दिली होती. महापौर श्रीकांचना यंनम यांनी रियाज खरादी यांच्या नावावर शिक्का मोर्तब केले होते.ज्यामुळे एमआयएमच्या दुसऱ्या गटनेत्याने यावर हरकत घेत न्यायालयात धाव घेतली होती.एकाच पक्षाकडून दोन वेगवेगळे नावे गेल्या मुळे मोठा पेच निर्माण झाला होता. नगरविकास खात्याने यावर स्थगिती आणली होती. पण हे प्रकरण उच्च न्यायालयात गेल्याने तात्काळ स्थायी समिती सभापती व परिवहन सभापती निवड घ्यावी असा आदेश आला होता. कोर्टाच्या निर्णयाला प्रतिसाद देत आज सभापती निवड प्रक्रिया होणार होती. पण सदस्य निवडीचा भोंगळ कारभार पाहून पून्हा एकदा समिती निलंबनाचा आदेश जिल्हाधिकारी यांना प्राप्त झाला होता.
आज सोमवारी सकाळी सभा सुरू होताच जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शासनाकडून आलेला आदेश वाचून दाखवला. यात महानगरपालिका सभेने स्थायी आणि परिवहन समिती सदस्य निवडीसाठी केलेले दोन्ही ठराव निलंबित केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी जाहिर केले. यामुळे स्थायी समिती सभापती निवड व परिवहन समिती सभापती निवडीला ब्रेक लागला आहे.
2018 पासून स्थायी समिती सभापतीविनाच सुरू आहे पालिकेचे कामकाज-
2018 मध्ये आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांच्या गटात चढाओढीमुळे स्थायी समितीच्या सभापती निवडीला गेल्या 2 वर्षांपासून ब्रेक लागला आहे.2018 मध्ये अर्ज दाखल करताना मोठा गोधळ निर्माण झाला होता. ऐन अर्ज दाखल करताना विजयकुमार देशमुख गटातील सभापती पदाच्या उमेदवाराचा अर्ज पळवून नेला होता. हा सर्व भोंगळ आणि गोंधळ न्यायालयात पोहोचल्याने गेल्या दोन वर्षांपासून स्थायी समितीचे कामकाज सभापतीविनाच पडत आहे.
हेही वाचा - शेतकऱ्याने मुलाप्रमाणे केले बैलावर प्रेम, वाजत गाजत काढली अंत्ययात्रा