सोलापूर - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा सोलापूर ( Solapur district first from Pune division in 12th exam ) जिल्हा पुणे विभागात अव्वल आला आहे. सोलापूर जिल्ह्याचा निकाल 94.15 टक्के लागला आहे. पुणे जिल्ह्याचा निकाल 91.46 टक्के लागला आहे. तर अहमदनगरचा निकाल 93.60 टक्के लागला आहे. सोलापुरात यंदा मुलींनी बाजी मारली आहे.
सोलापूर जिल्हा पुणे विभागात अव्वल : माध्यमिक शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार सोलापुरात 54 हजार 792 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यामध्ये 22 हजार 870 विद्यार्थीनी पैकी 21 हजार 850 विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या आहेत, तर 31 हजार 922 विद्यार्थ्यांनी (मुलं) परीक्षा दिली होती. त्यापैकी 29 हजार 443 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सोलापुरात एकूण 51 हजार 293 विद्यार्थी व विद्यार्थीनी बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. सोलापुरातील परीक्षा दिलेल्या पैकी 51 हजार 293 विद्यार्थी पास झाले आहेत. टक्केवारीनुसार पाहिले असता, सोलापुरातील 92.75 टक्के मुलं बारावी पास झाले आहेत. तर 96.11 टक्के मुली पास झाले आहेत. पुणे विभागातील सोलापूर जिल्ह्याचा एकूण 96.11 टक्के निकाल लागला आहे.
पुणे जिल्ह्याचा निकाल : महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळातील पुणे विभागात सोलापूर, पुणे आणि अहमदनगर असे तीन जिल्हे आहेत. पुणे जिल्ह्यात 69 हजार 625 विद्यार्थी व 59 हजार 632 विद्यार्थीनी असे एकूण 1 लाख 30 हजार 103 विद्यार्थी व विद्यार्थीनींनी बारावीची परीक्षा दिली होती. यामध्ये 62 हजार 652 विद्यार्थी व 55 हजार 574 विद्यार्थीनीं पास झाले आहेत. एकूण 1 लाख 10 हजार 226 विद्यार्थी व विद्यार्थीनी पास झाले आहेत. पुणे जिल्ह्याचा निकाल 91.46 टक्के इतका लागला आहे.
अहमदनगर जिल्ह्याचा निकाल : पुणे विभागातील अहमदनगर जिल्ह्यात 64 हजार 234 विद्यार्थी व विद्यार्थीनींनी बारावीची परीक्षा दिली होती. यामध्ये 37 हजार 420 विद्यार्थी व 26 हजार 914 विद्यार्थीनी होत्या. परीक्षा दिलेल्या मधून 34 हजार 270 विद्यार्थी पास झाले आहेत तर 25 हजार 854 विद्यार्थीनी पास झाल्या आहेत. एकूण 60124 विद्यार्थी व विद्यार्थीनी पास झाले आहेत. अहमदनगर जिल्ह्याचा एकूण निकाल 93.60 टक्के निकाल लागला आहे.
हेही वाचा - 12th Class Result : बारावीचा निकाल जाहीर, पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात विद्यार्थ्याचा जल्लोष