ETV Bharat / city

इंधन दरवाढी विरोधात सोलापुरात काँग्रेसचा बैलगाडी मोर्चा - बैलगाडी आणि सायकल चालवून निषेध

सध्या देशभरात इंधनाच्या दरवाढीचा भडका उडाला आहे, पेट्रोल शंभरी पार गेले आहे. कोरोनामुळे सर्वसामान्य जनता आर्थिक संकटात असताना इंधन दरवाढ करून सर्वसामन्य जनतेची लूट केली जात आहे. या वाढत्या महागाईचा निषेध व्यक्त करत केंद्र सरकारने इंधनाचे दर ताबडतोब कमी करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.

सोलापुरात काँग्रेसची बैलगाडी रॅली
सोलापुरात काँग्रेसची बैलगाडी रॅली
author img

By

Published : Jul 9, 2021, 8:05 AM IST

सोलापूर - पेट्रोल, डिझेल, घरगुती वापरातील गॅस सिलिंडर आणि खाद्य तेलाच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे, याचा निषेध करत गुरुवारी सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने सायकल आणि बैलगाडी रॅली काढण्यात आली. काँग्रेस भवन ते नवल पेट्रोल पंप असा रॅलीचा मार्ग होता. या रॅलीमुळे रंगभवन चौक, डफ्रिन चौक, हरिबाई शाळा मार्ग आदी ठिकाणी वाहतूक जाम झाली होती. जवळपास अर्धा तास वाहतूक व्यवस्था खोळंबली होती. डफरीन चौकाजवळील नवल पेट्रोल पंपाजवळ या रॅलीचा समारोप करण्यात आला. काँग्रेस शहर अध्यक्ष प्रकाश वाले जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी बैलगाडीचे सारथ्य करून इंधन दरवाढीवरून मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सायकल चालवत या निषेध रॅलीत सहभाग नोंदवला.

इंधन दरवाढी विरोधात सायकल मोर्चा
इंधन दरवाढी विरोधात सायकल मोर्चा
काँग्रेसकडून देशभरात तीव्र आंदोलनाचा इशारा-

सध्या देशभरात इंधनाच्या दरवाढीचा भडका उडाला आहे, पेट्रोल शंभरी पार गेले आहे. कोरोनामुळे सर्वसामान्य जनता आर्थिक संकटात असताना इंधन दरवाढ करून सर्वसामन्य जनतेची लूट केली जात आहे. या वाढत्या महागाईचा निषेध व्यक्त करत केंद्र सरकारने इंधनाचे दर ताबडतोब कमी करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. तसेच घरगुती वापरातील गॅस सिलिंडरची सबसिडी देखील बंद करण्यात आली आहे. दररोज वाढत चालल्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे हैराण झाले आहे. त्याविरुद्ध सोलापुरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकऱ्यांनी सायकल रॅली काढून तीव्र विरोध केला. यावेळी इंधनाचे दर आणि वाढती महागाई कमी नाही झाल्यास काँग्रेस देशभरात आंदोलन करेल, असा इशाराही यावेळी काँग्रेसच्या वतीने मोदी सरकारला देण्यात आला आहे.

सोलापुरात काँग्रेसची बैलगाडी रॅली
मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात पेट्रोल दर स्थिर होते-

मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात कच्च्या तेलाचे दर 108 ते 150 डॉलर प्रति बॅरल होते. तरी देखील पेट्रोल चे दर 72 रुपये प्रति लिटर होते.आज मोदी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारच्या काळात कच्या तेलाचे भाव 30 ते 70 डॉलर प्रति बॅरल आहेत. तरी देखील 106 रुपये प्रति लिटर पेट्रोल असे भाव आहेत. डिझेल 95.54 रुपये व घरगुती गॅस सिलिंडर 843 रुपयांच्या घरात गेले आहे. संपूर्ण जगात इंधनावर जास्त कर लावणारा देश म्हणून भारताची ओळख निर्माण झाली आहे. देशात कोरोनामुळे आर्थिक गणितं बिघडली आहेत. बेरोजगारी वाढली आहे. या संकटाच्या काळात केंद्र सरकार जनतेला आधार देण्याऐवजी जनतेकडून भाव वाढीच्या स्वरूपातून लूट केली जात आहे. भारतीय जनता पार्टी ही जनतेचा पैसा गोळा करणारी पार्टी झाली आहे, असा आरोप यावेळी काँग्रेस आंदोलकांनी केला आहे.

सोलापुरात काँग्रेसची बैलगाडी रॅली
सोलापुरात काँग्रेसची बैलगाडी रॅली
सायकल रॅलीत मोठी गर्दी-

इंधन दरवाढी विरोधात सोलापुरात काढण्यात आलेल्या या सायकल रॅलीला काँग्रेस कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी शहर अध्यक्ष प्रकाश वाले, नगरसेवक चेतन नरोटे,नगरसेवक विनोद भोसले, रियाझ हुंडेकरी, तौफिक हतुरे, परवीन इनामदार, हेमा चिंचोळकर, अंबादास करगुळे, अरुण साठे, भीमाशंकर टेकाळे, दादा कुमठे, अर्जुन पाटील, तिरुपती परकीपांडला, सुनील रसाळे, नागनाथ कदम, वसीम पठाण, अशोक कलशेट्टी, पशुपती माशाळ,रफिक इनामदार, बाबा मिस्त्री, आदींची प्रमुख उपस्थिती होती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.