पंढरपूर - गेल्या काही दिवसांपासून सोलापूरच्या 'फटे स्कॅम' चा मुख्य सुत्रधार विशाल फटे ( Barshi Vishal Fate Scam ) याला बार्शी न्यायालयाने दहा दिवसांची पोलीस कोठडी ( Vishal Fate Police Custody ) सुनावली आहे. 27 जानेवारीपर्यंत ही पोलीस कोठडी असणार असल्याची माहिती सरकारी वकील प्रदीप बोचरे यांनी माध्यमांना बोलताना दिली.
विशाल फाटे यांच्यावर बार्शी येथील नागरिकांना विविध प्रकारचे आमिष दाखवून 18 कोटी रुपये घोटाळा केला ( Barshi Vishal Fate Scam ) होता. यासंदर्भात सुमारे 81 जणांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. विशाल फटे याने सोमवारी रात्री सोलापूर ग्रामीण पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते ( Police Commissioner Tejswi Satpute ) यांच्या समोर आत्मसमर्पण केले.
त्यानंतर पोलिसांनी विशाल फटेला बार्शी न्यायालयात हजर करण्यात आले होते. तेव्हा फटेच्या वकिलांनी हा गुन्हा तांत्रिक असल्याने कमी दिवसांची कोठडी मिळावी असा युक्तिवाद केला. मात्र, याला सरकारी वकिल प्रदीप बोचरे यांनी विरोध करत पोलिसांची बाजू मांडली. त्यावेळी न्यायालयाने त्यास 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा - Nagpur Crime : पतीकडून पत्नीसह दोन चिमुरड्यांची हत्या; स्वत: केली आत्महत्या