ETV Bharat / city

हाथरस बलात्कार प्रकरण: आंबेडकरवादी संघटनेच्यावतीने सोलापुरात 'रेल्वे रोको' आंदोलन - Democratic youth front agitation in solapur

उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील मागास समाजातील तरुणीच्या हत्याप्रकरणाचे सोलापुरातही पडसाद उमटले आहेत. आंदोलकांनी रेल्वे रोको आंदोलन केले आहे.

आंदोलन करताना कार्यकर्ते
आंदोलन करताना कार्यकर्ते
author img

By

Published : Oct 6, 2020, 3:35 PM IST

Updated : Oct 6, 2020, 4:09 PM IST

सोलापूर- उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील मागास समाजातील तरुणीच्या बलात्कार व हत्याप्रकरणाच्या निषेधार्थ शहरातील ‘डेमोक्रेटीक युथ फ्रंट’च्या कार्यकर्त्यांनी मुंबईकडे जाणारी ‘उद्यान एक्सप्रेस’ रेल्वे रोखून धरली. याप्रसंगी केंद्र सरकार व उत्तर प्रदेश सरकारचा कार्यकर्त्यांकडून निषेध करण्यात आला. रेल्वे रोखल्याने रेल्वे प्रशासनाची व पोलीस प्रशासनाची एकच तारांबळ उडाली होती. ही रेल्वे जवळपास 8 ते 10 मिनिटे थांबली होती.

शेटे वस्ती येथील पुलावर ‘डेमोक्रेटीक युथ फ्रंट’च्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी आंदोलन केले. आंबेडकरवादी संघटनेच्या कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची सकाळी 10 वाजल्यापासून शेटे वस्ती येथील रेल्वे रुळांवर हालचाल सुरू होती. अतिशय गुपित ठेवून हे आंदोलनाची योजना करण्यात आली होती. कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन शेटे वस्ती परिसर दणाणून सोडला होता. हाथरस येथील पीडितेला न्याय मिळाला पाहिजे, आरोपींना फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे अशी कार्यकर्त्यांनी मागणी केली. तसेच योगी सरकार व मोदी सरकार यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.

आंबेडकरवादी संघटनेच्यावतीने सोलापुरात 'रेल्वे रोको' आंदोलन

हाथरस पोलीस प्रशासन व जिल्हाधिकारी यांच्यावरदेखील कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करून सहआरोपी करण्याची कार्यकर्त्यांनी मागणी केली. या मागण्यांसह जोपर्यंत पीडितेला न्याय मिळत नाही, तोपर्यंत देशभर आंबेडकरवादी तरुण ‘जन आंदोलन’ करतच राहतील, असे आंदोलकांनी भूमिका घेतली. रेल्वे रोखल्यानंतर आरपीएफच्या जवानांनी घटनास्थळी ताबडतोब येत आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला.

फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साळुंखे हे फौजफाटा घेऊन आले. त्यांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले. रेल्वे रोको आंदोलनात सोहन लोंढे, अनुराग सुतकर, सुमित शिवशरण, मनोज भालेराव व डेमोक्रेटीक युथ फ्रंट व शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

सत्यजित वाघमोडे म्हणाले, की योगी सरकारने पीडितेचा खून केला आहे. ही आंदोलनाची मशाल व्हावी. अजित बनसोडे म्हणाले, योगी सरकार व मोदी सरकार बहुजनांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही पुढील आंदोलन दिल्लीत करणार आहोत. पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्याची माहिती दिली. तसेच तातडीने उद्यान एक्प्रेस रवाना केल्याची माहिती दिली आहे.

Last Updated : Oct 6, 2020, 4:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.