ETV Bharat / city

Vijay Barse in Solapur : झोपडपट्टी फुटबॉल संघ संपूर्ण देशात तयार करणार - विजय बारसे

नागपूर शहरात एका झोपडपट्टी भागातील काही लहान मुलं, प्लास्टिकच्या बादलीला फुटबॉल करून पायाने मारत खेळत होते. ही घटना 2001 साली घडली होती. तेव्हा मनात ठाम निर्णय केला की, झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉलचे प्रशिक्षण द्यावे. त्यावेळी स्लम सॉकर ( Slum Soccer ) स्थापन करून प्रवास सुरू झाला. या झोपडपट्टीतील मुलांना घेऊन दक्षिण आफ्रिकेतील स्पर्धेत भाग घेतला. नेल्सन मंडेला यांनीही विजय बारसे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली होती. याबाबत अनेक वेळा लेख छापून आले. ते वाचून दिग्दर्शक नागराज मुंजळे ( Nagraj Manjule ) भेटीसाठी आले आणि अमिताभ बच्चन ( Amitabh Bacchan ) यांच्या प्रमुख भूमिकेत झुंड हा चित्रपट ( Jhund ) प्रदर्शित झाला, अशी माहिती विजय बारसे ( Vijay Barse ) यांनी दिली.

छायाचित्र
छायाचित्र
author img

By

Published : Mar 16, 2022, 5:43 PM IST

Updated : Mar 16, 2022, 6:22 PM IST

सोलापूर - ज्यांच्या जीवनावर झुंड चित्रपट ( Jhund ) साकारण्यात आला ते फुटबॉल प्रशिक्षक व स्लम सॉकरचे संस्थापक ( Slum Soccer ) विजय बारसे ( Vijay Barse ) विजय बारसे सोलापुरात आले होते. माजी आमदार नरसय्या आडम यांच्या उपस्थितीत विजय बारसे यांचा भव्य सत्कार करण्यात आला. झुंड चित्रपटमध्ये ज्या प्रमाणे झोपडपट्टी फुटबॉल संघ दाखवण्यात आला. तसेच संघत देशातील प्रत्येक शहरात यापुढे पहावयास मिळतील. त्यासाठी स्लम सॉकर संघटना काम करणार असल्याची माहिती विजय बारसे यांनी सोलापुरात दिली.

बोलताना विजय बारसे

झोपडपट्टीतील खेळाडूंचा सत्कार - विजय बारसे यांच्या हस्ते सोलापुरातील झोपडपट्टी भागातील खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. कुर्बान हुसेन नगर या झोपडपट्टीतील रहिवासी श्रेया शिंदे, ओसामा बेग, वरद हक्के या तीन धावपटूंनी दिल्ली येथील राष्ट्रीय ऑलम्पिक स्पर्धेत विविध गटात सुवर्ण पदक मिळवले. या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत विजय बारसे यांनी सर्वतोपरी मदत करू, असे आश्वासन दिले.

बावीस वर्षांपूर्वी झोपडपट्टी खेळाडूंचा झाला होता प्रवास सुरू - विजय बारसे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले, नागपूर शहरात एका झोपडपट्टी भागातील काही लहान मुलं, प्लास्टिकच्या बादलीला फुटबॉल करून पायाने मारत खेळत होते. ही घटना 2001 साली घडली होती. तेव्हा मनात ठाम निर्णय केला की, झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉलचे प्रशिक्षण द्यावे. त्यावेळी स्लम सॉकर स्थापन करून प्रवास सुरू झाला. या झोपडपट्टीतील मुलांना घेऊन दक्षिण आफ्रिकेतील स्पर्धेत भाग घेतला. नेल्सन मंडेला यांनीही विजय बारसे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली होती. याबाबत अनेक वेळा लेख छापून आले. ते वाचून दिग्दर्शक नागराज मुंजळे भेटीसाठी आले आणि अमिताभ बच्चन यांच्या प्रमुख भूमिकेत झुंड प्रदर्शित झाला.

झोपडपट्टी फुटबॉल पथक आता सर्व शहरात पहावयास मिळेल - देशातील प्रत्येक शहरात झोपडपट्टी आहे. त्या ठिकाणी राहणाऱ्या तरुणांना अनेक वाईट सवयी आहेत. आता स्लम सॉकर संघटना अशा झोपडपट्टी भागात जाऊन तेथील नवीन पिढीला त्यांच्या आवडीनुसार क्रीडा प्रकारात प्रशिक्षण देणार आहे. त्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती विजय बारसे यांनी सोलापूर येथे बोलताना दिली. तसेच सोलापुरातील झोपडपट्टी भागातही विशेष प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी कार्यक्रमात माजी आमदार नरसय्या आडम, अनिल वासम, युसूफ शेख, नासीमा शेख, ऍड. एम एच शेख, नलिनी कलबुर्गी आदी उपस्थित होते.

हेही वाचा - Doctors Strike For Various Demands : डॉक्टरांच्या कामबंद आंदोलनामुळे रुग्णसेवेला ब्रेक; शिकाऊ डॉक्टरांच्या खांद्यावर जबाबदारी

Last Updated : Mar 16, 2022, 6:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.