सोलापूर - बार्शी शहर शिवसेना व महिला आघाडी ( shivsena party workers in tanaji sawant collage ) यांच्यावतीने बंडखोर आमदार तानाजी सावंत यांचे बार्शी बायपासला असलेल्या बी.आय.टी. कॉलेजमध्ये तोडफोड ( ruckus in rebel shivsena mla tanaji sawant collage ) करण्यात आली. आणि तानाजी सावंत यांनी केलेल्या बंडखोरीचा निषेध करून आंदोलन ( shivsena mla tanaji sawant collage in solapur ) करण्यात आले. यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या नेत्या सुनंदा चव्हाण, सोनाली गायकवाड, दत्ता सोनवणे, सुरज भालशंकर, बापू तेलंग आंधळकर, कार्यकर्ते हजर होते.
हेही वाचा - MLA Praniti Shinde Solapur : 'महाविकास आघाडी सरकार ही लढाई शभंर टक्के जिंकणार'
तानाजी सावंत यांच्या मालकीच्या महाविद्यालयात जाऊन गोंधळ - शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाचा मोठा गट फोडल्यानंतर आता शिवसैनिक संतप्त झाले आहेत. तानाजी सावंत यांचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात असलेल्या भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या महाविद्यालयामध्ये शनिवारी संध्याकाळी शिवसैनिकांनी जाऊन गोंधळ केला. यावेळी महाविद्यालयात उद्धव ठाकरे आणि शिवाजी महाराजांचे फोटो लावू नका, अशी मागणी करताना शिवसैनिक दिसून आले. महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी समजूत घालण्याच्या प्रयत्न केला. पण, प्रचंड संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी महाविद्यालयाच्या आवारात दगडफेक करत काचा फोडल्या. शनिवारी सकाळी पुण्यात देखील शिवसैनिकांनी तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे.
सोलापूर शहरातील शिवसैनिक मात्र शांतच - सोलापूर शहरात अनेक शिवसैनिक कार्यकर्ते व नेते आहेत. आमदार एकनाथ शिंदे हे इतर आमदारांचा मोठा गट घेऊन सत्ता स्थापन करण्याच्या भूमिकेत आहेत. राज्यातील शिवसेनेत प्रचंड खळबळ उडाली आहे. सोलापूर शहरात याबाबत गुरुवारी शासकीय विश्रामगृह येथे शिवसैनिकांची बैठक झाली. पण, या बैठकीत शिवसैनिकांनी सावध भूमिका घेत बंडखोर आमदारांविरोधात बोलणे टाळले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात शिवसेनेचे कार्यकर्ते बंडखोर आमदारांची कार्यालये फोडत आहेत. मात्र, सोलापूर शहरातील शिवसेनेत स्मशानशांतता आहे.
हेही वाचा - Solapur University Exam : आषाढी वारीमुळे सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षेत मोठा बदल, 'ही' आहे नवी तारीख