ETV Bharat / city

MP Vinayak Raut Criticism शहाजीबापू पाटील हे फक्त विनोद करू शकतात विकास नाही, विनायक राऊतांची खोचक टीका - शहाजीबापू पाटील

MP Vinayak Raut Criticism शिवसेना खासदार विनायक राऊत Shiv Sena MP Vinayak Raut हे आज सोलापूर दौऱ्यावर आले आहेत सांगोला येथील मतदार संघात त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे त्यापूर्वी सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात राऊत यांनी माध्यमांशी बोलताना शहाजीबापू पाटील यांच्यावर टीका केली आहे

शिवसेना खासदार विनायक राऊत
शिवसेना खासदार विनायक राऊत
author img

By

Published : Aug 21, 2022, 12:16 PM IST

सोलापूर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, सांगोल्याचे शहाजीबापू पाटील हे फक्त विनोद करू शकतात, मतदार संघात विकास करू शकत नाहीत. शिवसेना खासदार विनायक राऊत हे आज सोलापूर दौऱ्यावर आले आहेत. MP Vinayak Raut Criticism सांगोला येथील मतदार संघात त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यापूर्वी सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात राऊत यांनी माध्यमांशी बोलताना शहाजीबापू पाटील यांच्यावर टीका केली आहे.

बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर मत मागितली महाराष्ट्र राज्यात बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर मत मागण्याचे सूतोवाच देवेंद्र फडणवीस यांनीच सुरू केले आहे. कारण त्यांना माहिती झालं आहे, नरेंद्र मोदी यांची जादू संपली आहे. मोदी पर्व संपल आहे, हे देवेंद्र यांनी मान्य केलं आहे. Shiv Sena MP Vinayak Raut महाराष्ट्र राज्यात आज जी मुंबई उभी आहे, ती केवळ शिवसेनेमुळे आणि तेथील शिवसेनेच्या नगरसेवकांमुळे उभी आहे, असे खासदार विनायक राऊत म्हणाले.

शिवसेना खासदार विनायक राऊत

गुलाबराव पाटील शपथ घेऊन गुहाटीला पळून गेले गुलाबराव पाटील हे गुहाटीला जाण्यापूर्वी उद्धव ठाकरेंसोबत बैठकीत होते. 20 आमदारांची बैठक झाली होती. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी सर्वांच मत जाणून घेतले होते. उद्धव ठाकरेंनी स्वतः सांगितले होते की, कोणाला मुख्यमंत्री व्हायचं असेल तर स्पष्टपणे सांगा. त्यावेळी कोणीही काहीही सांगितलं नव्हतं, उपस्थित असलेल्या 20 आमदारांनी शपथ घेतली होती. गुलाबराव पाटील यांनी सुद्धा शपथ घेतली आणि नंतर ते गुहाटीला पळून गेले, असे खासदार विनायक राऊत यांनी माहिती देताना सांगितले आहे.

हेही वाचा Nana Patole Criticized Fadnavis राज्यातील 5 लाख विद्यार्थी शिक्षकांविना, नाना पटोले यांची फडणवीस सरकारवर टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.