पंढरपूर : मंगळवेढ्यात टेम्पो आणि कार मध्ये झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मुत्यू ( Mangalwedha Accident Three Dead ) झाला आहे. तर चार जण गंभीर ( Mangalwedha Accident Four Injured )जखमी झाले आहेत. शनिवारी सायंकाळच्या सुमारास दामाजी कारखान्याच्या ( Damaji Sugar Mill Mangalwedha ) रस्त्याजवळ ही घटना घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सोलापूरहुन येणारी कार आणि सोलापूरकडे जाणाऱ्या टेम्पोचा समोरासमोर जोराची धडक झाली. यामध्ये कारमधील जैनुद्दिन काशीम यादगिरे ( वय 40 रा.उमदी ता.जत जि.सांगली ) व मौलाना साजिद खान (वय 45, मुंबई, भिवंडी सध्या रा.उमदी ता.जत जि.सांगली ) यांचा जागीच मृत्यु झाला. तर प्रवीण हिरेमठ यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे.
हे तिघे जण उमदी तालुका जत येथील असून इस्तमासाठी औरंगाबाद येथे तीन दिवसापूर्वी गेले होते. तेथून परत येताना हा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की त्यामध्ये कारचा चक्काचूर झाला आहे.