ETV Bharat / city

वीज बिल माफ न केल्यास महावितरण कार्यालयांना टाळे ठोकू - संभाजी आरमार

वापरापेक्षा जादा बिल आल्याचे सर्वच वीज ग्राहकांचे म्हणणे असून वीज कंपनीकडून जनतेची लुटमार सुरू असल्याची भावना निर्माण झाली आहे. अशा संकट काळात वीज बिल माफी देऊन ग्राहक सेवेचा अत्युच्च मानदंड सरकार आणि वीज कंपनीने घालून द्यावा. सर्व उद्योग जगत वेगवेगळ्या माध्यमातून देशाकरता योगदान देत असताना महावितरण कंपनी मात्र अशा संकट समयी वाढीव वीज बिलाच्या माध्यमातून नफेखोरी करत असेल तर हे अशोभनीय आहे.

sambhaji armar ghantanad agitation for electricity bill waiver at solapur
वीज बिल माफ न केल्यास महावितरण कार्यालयांना टाळे ठोकू
author img

By

Published : Sep 7, 2020, 3:06 PM IST

Updated : Sep 7, 2020, 3:34 PM IST

सोलापूर - वीज बिल माफ करावे या मागणीसाठी संभाजी आरमारकडून सोमवारी सकाळी महावितरण कंपनीच्या जुनी मिल येथील मुख्य कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी लाॅकडाऊनच्या आघाताने मेटाकुटीला आलेल्या जनतेचे कंबरडे अव्वाच्या सव्वा वीज बिलाने मोडले आहे. महावितरण कंपनीने नफेखोरी न करता जनतेला वीज बिल माफी द्यावी अन्यथा महावितरण कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा दिला.

वीज बिल माफ न केल्यास महावितरण कार्यालयांना टाळे ठोकू - संभाजी आरमार

कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशभरात सरकारने टाळेबंदी घोषित केली होती. या कालावधीमध्ये उद्योग व्यवसाय ठप्प झाल्याने वीज बिल भरण्याकरता मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, तीन महिन्यांच्या अंतराने आलेल्या वीज बिलाच्या अवाढव्य रक्कमेने जनतेला मोठा झटकाच बसला आहे. सरासरीपेक्षा दुप्पट तिप्पट बिल आल्याचे प्रकार सर्रास सर्वत्रच निदर्शनास येत आहेत. या अव्वाच्या सव्वा बिलाच्या रक्कमेने रोगराई, बेरोजगारीने त्रस्त असलेल्या जनतेचे कंबरडेच मोडले आहे. वापरापेक्षा जादा बिल आल्याचे सर्वच वीज ग्राहकांचे म्हणणे असून वीज कंपनीकडून जनतेची लुटमार सुरू असल्याची भावना निर्माण झाली आहे. अशा संकट काळात वीज बिल माफी देऊन ग्राहक सेवेचा अत्युच्च मानदंड सरकार आणि वीज कंपनीने घालून द्यावा. सर्व उद्योग जगत वेगवेगळ्या माध्यमातून देशाकरता योगदान देत असताना महावितरण कंपनी मात्र अशा संकट समयी वाढीव वीज बिलाच्या माध्यमातून नफेखोरी करत असेल तर हे अशोभनीय आहे. त्यामुळे या घंटानाद आंदोलनाद्वारे नफेखोरीत रममाण झालेल्या वीज कंपनीला जाग आणून देण्याचा प्रयत्न संभाजी आरमार करत आहे.

याप्रसंगी संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे, कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, जिल्हाप्रमुख गजानन जमदाडे, जिल्हा संघटक अनंतराव नीळ, संजय सरवदे, उपजिल्हाप्रमुख राजेश पाटील, उपशहरप्रमुख सागर ढगे, सोमनाथ मस्के, मल्लिकार्जुन पोतदार, सुधाकर करणकोट, राजु रच्चा, सागर सासणे, सागर दासी, अक्षय अच्युगटला, व्यंकटेश मद्राल, एजाज नाईकवाडी, नागराज परकीपंडला, प्रवीण द्यावरकोंडा, अमीत जोगदंड, राजु आखाडे गणेश ढेरे, अविनाश वीटकर, राहुल कांबळे आदीसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Last Updated : Sep 7, 2020, 3:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.