ETV Bharat / city

हळद एकाबरोबर आणि लग्न दुसऱ्याबरोबर ही शिवसेनेची भूमिका - सदाभाऊ खोत

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेने हळद एकाबरोबर आणि लग्न दुसऱ्याबरोबर अशी भूमिका घेतली. भाजपा बरोबर ठरलेले लग्न साखरपुड्यासकट मोडून हळदीच्या अंगाने शिवसेना पळून गेली, अशी सडकून टीका रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी सोलापूर येथे केली.

सदाभाऊ खोत
सदाभाऊ खोत
author img

By

Published : Oct 5, 2021, 7:02 PM IST

Updated : Oct 5, 2021, 7:38 PM IST

सोलापूर - विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठरलेले लग्न मोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत शिवसेना पळून गेली. शिवसेना भाजपा महायुतीने लोकसभा आणि विधानसभा एकत्र लढविली. जनतेने महायुतीला भरघोस प्रतिसाद दिला. मात्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेने हळद एकाबरोबर आणि लग्न दुसऱ्याबरोबर अशी भूमिका घेतली. भाजपा बरोबर ठरलेले लग्न साखरपुड्यासकट मोडून हळदीच्या अंगाने शिवसेना पळून गेली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या म्हणण्यानुसार शिवसेना जर स्वतंत्र निवडणूक लढली असती तर त्यांना कळले असते, अशी सडकून टीका रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी सोलापूर येथे केली.

'फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवावा'

मंगळवारी सोलापुरात रयत क्रांती संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता. उसाची एफआरपी एकरकमी मिळावी, अशी प्रमुख मागणी या मोर्चात करण्यात आली. उत्तर प्रदेशात शेतकरी आंदोलनादरम्यान आठ जणांना जीव गमवावा लागला. त्यामुळे हा खटला फास्ट्ट्रॅक कोर्टात चालवावा आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान मृत्यूस कारणीभूत असणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी किंवा फासावर लटकवण्यात यावे, अशी मागणीही सदाभाऊंनी केली.

'महाविकास आघाडी सरकार एक विदूषक'

राज्यातील महाविकास आघाडी सरकार एक विदूषक आहे. महाराष्ट्रातील जमतेची करमणूक करण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे. त्यामुळे राज्यात अतिवृष्टीमुळे जे संकट उभे राहिले आहे, त्यासाठी पंचनामे न करता सरसकट तातडीने खरीप पिकाला 60 हजार आणि बागायती पिकाला 1 लाख रुपये प्रति हेक्टर अनुदान द्यावे, अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली.

Last Updated : Oct 5, 2021, 7:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.