सोलापूर : सोलापूरच्या रेल्वे स्थानकाला ( Solapur railway station ) साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यासाठी सोलापुरात सध्या जोर वाढला आहे. मातंग समाजातील युवा कार्यकर्ते या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत. डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या ( Democratic Party of India )वतीने रविवारी सकाळी सोलापूर रेल्वे स्थानकाच्या दर्शनी भागातील टेरेसवर चढून कार्यकर्त्यानी जोरदार घोषणाबाजी केली. रेल्वे स्थानकाला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे ( Sahityaratna Annabhau Sathe ) नाव देण्याकडे लक्ष वेधण्यात आले. अचानक झालेल्या आंदोलनामुळे पोलिसांची एकच धावपळ झाली होती.
सोलापूर रेल्वे स्टेशनच्या नामकरणासाठी आंदोलक चढले रेल्वे स्टेशनच्या 'टेरेसवर' - साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्याची मागणी
सोलापूरच्या रेल्वे स्थानकाला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे ( Sahityaratna Annabhau Sathe ) यांचे नाव द्यावे यासाठी आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या ( Democratic Party of India ) वतीने करण्यात आले. त्यावेळी काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.