सोलापूर - विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे बुलेट प्रुफ वाहन सरकारने ताफ्यातून कमी केले आहे. यावर बोलताना विधापरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकार सुड भावनेने काम करत असल्याची टीका केली आहे.
पोलीस महासंचालकांचा अहवाल असतानाही सुरक्षा फडणवीसांची काढली
महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल यांनी देवेंद्र फडणवीस यांना सुरक्षा देण्याविषयी राज्य सरकारला अहवाल दिला होता. तरीही या सरकारने सुड भावनेने फडणवीसांचे बुलेट प्रुफ वाहन काढून घेतल्याचे दरेकर म्हणाले.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ठाकरे परिवाराला दिली होती सुरक्षा
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ठाकरे परिवाराच्या प्रत्येक सदस्याला सुरक्षा देण्यात आली होती. त्यांनी कधीच असा विचार केला नव्हता. हे व्यक्तीगत द्वेषातून केले जात आहे. यामध्ये राजकीय उद्देश आहे, हे स्पष्टपणे दिसत असल्याचेही प्रवीण दरेकर म्हणाले.
भयभीत जनतेला सुरक्षा द्यावी
राज्य सरकारने आम्हाला सुरक्षा दिली नाही तरी चालेल. पण, राज्यातील भयभीय जनतेला योग्य सुरक्षा द्यावी, अशी मागणी दरेकर यांनी यावेळी केली.
हेही वाचा - बारलोणी येथे पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या आरोपींच्या आवळल्या मुसक्या
हेही वाचा - भंडाऱ्यातील घटनेमुळे राज्यातील आरोग्य व्यवस्थेचे पितळ उघड पडले - दरेकर