ETV Bharat / city

भारतीय पोस्टाच्या लिफाफ्यावर मालदांडीचे चित्र; मंगळवेढ्याच्या ज्वारीला देणार प्रसिद्धी

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्याला राज्यात ज्वारीचे कोठार म्हणून ओळखले जाते. मंगळवेढा शिवारात पिकणारी ज्वारीची चवीला रुचकर आहे. तसेच या मालदांडी वाणाच्या ज्वारीला राज्यभरातून मागणी आहे. मंगळवेढ्यातील जमिनीच्या वैशिष्ठ्यामुळे मालदांडी ज्वारीला उतार भरपूर पडतो. तसेच या ज्वारीची उत्पादन वाढावे या दृष्टीने मालदांडी या ज्वारीच्या नैसर्गिक वाणा बाबतची सविस्तर माहिती आत्मा, सोलापूरकडून देण्यात आली. तसेच शेतकरी हिताच्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली.

मंगळवेढ्याच्या ज्वारीला देणार प्रसिद्धी
मंगळवेढ्याच्या ज्वारीला देणार प्रसिद्धी
author img

By

Published : Sep 19, 2021, 10:34 AM IST

पंढरपूर (सोलापूर)- ज्वारीचे कोठार म्हणून मंगळवेढा तालुक्याला ओळखले जाते. त्यातच आता मंगळवेढ्याच्या मालदांडी ज्वारीचा भारतीय पोस्ट विभागाकडूनही विशेष सन्मान करण्यात आला आहे. पोस्टाने मंगळवेढ्याच्या मालदांडी ज्वारीला प्रसिद्धी देण्यासाठी 'मंगळवेढा ज्वारी'चे छायाचित्र दर्शवणारा एक विशेष लिफाफा तयार केला आहे. शनिवारी पोस्टाचे जनरल जी. मधुमिता दास यांच्या हस्ते याचे अनावरण करण्यात आले. पोस्टाकडून 'मंगळवेढा ज्वारी'चे प्रसिद्धी करण्यासाठी यामाध्यामतून प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

मंगळवेढ्याच्या ज्वारीला देणार प्रसिद्धी

राज्याकडून मंगळवेढ्याच्या ज्वारीला भौगोलिक मानांकन-

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्याला राज्यात ज्वारीचे कोठार म्हणून ओळखले जाते. मंगळवेढा शिवारात पिकणारी ज्वारीची चवीला रुचकर आहे. तसेच या मालदांडी वाणाच्या ज्वारीला राज्यभरातून मागणी आहे. मंगळवेढ्यातील जमिनीच्या वैशिष्ठ्यामुळे मालदांडी ज्वारीला उतार भरपूर पडतो. तसेच या ज्वारीची उत्पादन वाढावे या दृष्टीने मालदांडी या ज्वारीच्या नैसर्गिक वाणा बाबतची सविस्तर माहिती आत्मा, सोलापूरकडून देण्यात आली. तसेच शेतकरी हिताच्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली.

मालदांडी ज्वारी विकास संघाकडून मंगळवेढ्याच्या मालदांडी ज्वारीस महाराष्ट्र राज्याकडून भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते. या कार्याबाबत तालुका कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे यांनी दिली. तसेच भौगोलिक मानांकन मिळाल्यानंतर आता पोस्टाकडून या ज्वारीच्या प्रसिद्धीसाठी प्रयत्न केले जात आहेत.

या अनावरण कार्यक्रमप्रसंगी भारतीय पोस्टाच्या पुणे विभागाच्या पोस्टमास्टर जनरल जी. मधुमिता दास, सोलापूरचे सहाय्यक आयुक्त अर्जुनसिंह पाटील,आत्मा सोलापूरचे प्रकल्प संचालक मदन मुकणे , मालदांडी ज्वारी विकास संघाचे सचिव मंगल श्रीरंग काटे मंगळवेढा ,पंढरपूर आणि मंगळवेढा येथील इतर सन्मानित पाहुणे तसेच डाक विभागाचे उच्च पदस्थ अधिकारी व नामांकित व्यक्ती उपस्थित होते.

हेही वाचा - ....आता कोथळा काढायची भाषा केली जाते; शरद पवारांनी नेत्यांची केली कानउघडणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.