ETV Bharat / city

बनावट कागदपत्रांद्वारे सिमकार्ड विकणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात; मोठे रॅकेट असण्याचा संशय - सोलापूर पोलीस

स्थानिक सायबर पोलिसांनी बनावट कागदपात्रांच्या आधारे सिमकार्ड खरेदी करणाऱ्या टोळीला जेरबंद केले आहे. सायबर पोलिसांनी सहा संशयीत आरोपींना ताब्यात घेऊन 75 हजार रुपयांचे मोबाइल आणि विविध कंपनीचे 12 सिम कार्ड जप्त केले आहेत.

solapur cyber cell
बनावट कागदपत्रांद्वारे सिमकार्ड विकणारा पोलिसांच्या ताब्यात; मोठे रॅकेट असण्याचा संशय
author img

By

Published : Dec 25, 2020, 5:52 PM IST

सोलापूर - स्थानिक सायबर पोलिसांनी बनावट कागदपात्रांच्या आधारे सिमकार्ड खरेदी करणाऱ्या टोळीला जेरबंद केले आहे. सायबर पोलिसांनी सहा संशयीत आरोपींना ताब्यात घेऊन 75 हजार रुपयांचे मोबाइल आणि विविध कंपनीचे 12 सिम कार्ड जप्त केले आहेत. अवैध व्यवसाय करणारे संशयित या बनावट कागदपात्रांचे सिम कार्ड वापरत होते. या प्रकरणातील आणखी काही आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

स्टोअर्स मालक निघाला मुख्य संशयित

सोलापूर शहरात बनावट कागदपत्रे सादर करून सिम कार्ड विकत मिळत असल्याची तक्रार सायबर पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलिसांनी बलिदान चौक येथील खाऊघर या जनरल स्टोर्सची चौकशी सुरू केली. गोपाल मुदंडा यास ताब्यात घेऊन त्याची विचारपूस सुरू केली. या चौकशीमधून गोपाल याने विविध कंपन्यांचे सिम कार्ड बनावट कागदपत्रांद्वारे विकल्याची माहिती समोर आली. यावेळी एका जनरल स्टोअर्सचा मालकच मुख्य संशयित आरोपी निघाल्याचे समोर आले.

बनावट कागदपत्रांद्वारे सिमकार्ड विकणारा पोलिसांच्या ताब्यात; मोठे रॅकेट असण्याचा संशय

संशयित आरोपींची नावे

पोलिसांनी ताबडतोब कारवाईचा बडगा उचलत सिम कार्ड विकत घेतलेल्या सहा संशयितांना ताब्यात घेतले. राजेंद्र नागनाथ मंनुरे(वय 37 रा घोंगडे वस्ती),स्वामी दोरग वर्गांटी(रा भवानी पेठ), कमल किशोर नंदकिशोर अट्टल(वय 38,रा गुरुदत्त चौक,घोंगडे वस्ती), नागेश सुभाष येळमेळी(वय 32 वर्ष ,भवानी पेठ), महंतय्या गुरय्या स्वामी(वय 32 वर्ष,रा जंगम वस्ती अक्कलकोट रोड) असे एकूण सहा आरोपीना अटक केले आहे.

पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे, पीएसआय विशेद्र सिंग बायस, पीएसआय नागेश वहटकर, श्रीरंग कुलकर्णी, सचिन गायकवाड, संतोष येळे, बाबू मंगरुळे, वसीम शेख, अर्जुन गायकवाड, अमोल कानडे, करण माने, इब्राहिम शेख यांनी संबंधित कारवाई पार पाडली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.