सोलापूर- तुळजापुर नाका ते रुपा भवानी मंदिरादरम्यान रस्त्याने जाणाऱ्या लोकांना एका टोळीने नाकी नऊ आणले होते. त्यांच्या जवळील पिस्तुलाचा धाक दाखवुन लोकांना मारहाण करत होते व लुटमार करत होते. तसेच पिस्तुल आणि गुप्तीचा धाक दाखवत लोकांना विवस्त्र करत होते. त्यांना अश्लील कृत्य करण्यास भाग पाडत होते. जोडभावी पेठ पोलिसांनी ( Jodbhavi Peth Police ) या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
जोडभावी पेठ पोलिसांनी अटक केलेले आरोपी ( Jodbhavi arrest gang in Solapur ) हे लोकांना शेण खाण्यास भाग पाडत होते. या घटनेचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करून सोशल मीडियावर प्रसारित करत होते. यामुळे सोलापुरात एक भीतीदायक वातावरण पसरले होते. तसेच अनेकांच्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडीओ ( Video of obscene acts in Solapur ) आले होते. जोडभावी पेठ पोलिसांनी या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
हेही वाचा-Brothers killed sister's husband : मनाविरुद्ध लग्न केल्याने भावांनी केली बहिणीच्या नवऱ्याची हत्या
बंदुकीच्या धाकावर अश्लील व्हिडीओ रिकोर्ड
सोलापूर तुळजापूर महामार्गावर आरोपी त्यांच्याकडील गावठी पिस्तुलचा व धारधार गुप्तीचा धाक दाखवित होते. रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्यांची अडवणुक करून त्यांना मारहाण व दमदाटी करत होते. त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी देऊन त्यांना विवस्त्र करत होते. त्यांना अश्लील कृत्य करण्यास भाग पाडून शेण खाण्यास भाग पाडत होते. असे अश्लिल कृत्य करण्यास भाग पाडून त्यांचे मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्डींग करून ते व्हॉट्सअॅपमध्ये प्रसारीत करत होते. तसेच सोशल मीडियावरदेखील प्रसारित करत होते.
हेही वाचा-डोंबिवलीत कौटुंबिक हिंसाचार; दोन्ही घटनेत पतीकडून पत्नीवर धारदार शस्त्राने वार
जोडभावी पेठ पोलिसांना खबऱ्याने माहिती दिली-
जोडभावी जोडभावी पेठ पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक केतन मांजरे यांना गुप्त बातमीदारांमार्फत आरोपीबाबत माहिती मिळाली बातमी होती. गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदारांसह रुपा भवानी मंदिराकडुन जुना तुळजापुर नाकाकडे जाणाऱ्या सर्विस रोडच्या कोपऱ्यावर सापळा रचला. यावेळी सागर अरुण कांबळे( वय २२ वर्ष,रा.ज्यू बुधवार पेठ, भिम विजय चौक, सोलापुर), बुध्दभुषन नागसेन नागटिळक, (वय २६ वर्ष रा. न्यु बुधवार पेठ, आंबेडकर उद्यानजवळ सोलापुर), सतीश ऊर्फ बाबुला अर्जुन गायकवाड (वय २५ वर्ष रा मिलिंद नगर, बुधवार पेठ, सोलापुर ),अक्षय प्रकाश थोरात (वय २६ वर्ष , रा.मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर, न्यु बुधवार पेठ, विश्वदीप चौक, सोलापुर ) यांना ताब्यात घेतल्याचे सोलापूर शहर पोलीस दलाचे पोलीस उप आयुक्त डॉ. वैशाली कडुकर ( DCP Dr Vaishali Kadukar ) यांनी सांगितले.
हेही वाचा-Pandharpur crime : पुष्पा चित्रपटाची पुनरावृत्ती; 138 किलो चंदन पोलिसांनी केले जप्त
अंगझडती घेतली असता हत्यार जप्त -
पोलिसांनी संशयीत आरोपीची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एक गावठी पिस्तुल, एक धारधार गुप्ती, चार मोबाईल फोन व दोन मोटारसायकल मिळून आले. मिळालेल्या मोबाईल व्हि.डीओची दोन पंचासमक्ष पाहणी केली . त्यामध्ये अश्लिल व्हिडीओ होते .ते सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे दिसून आले. पोलिसांनी चार संशयीत आरोपी विरोधात जोडभावी पेठ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक विजयालक्ष्मी कुर्री ( PI Vijayalaxmi Kurri ) हे करीत आहेत.
या पोलिसांनी कारवाईत घेतला सहभाग-
पोलीस उप आयुक्त (परीमंडळ) डॉ. वैशाली कडुकर, एसीपी डॉ. संतोष गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब भालचिम, पोलीस निरीक्षक विजयालक्ष्मी कुरी (गुन्हे) यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारवाईसाठी मार्गदर्शन केले. पोलिसांच्या कारवाईत गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख पोलीस उप निरीक्षक केतन मांजरे, आबा थोरात, सुरेश जमादार, अतुल गवळी, खाजप्पा आरेनवरु थिटे, राजेश घोडके, स्वप्निल कसगावडे, गोपाळ शेळके, दत्ता काटे, बाळु माने, नागटिळक, सुहास गायकवाड यांनी सहभाग घेतला.