ETV Bharat / city

Pandharpur : कष्ट आणि आत्मविश्वासाच्या जोरावर शेतकऱ्याचं पोरगं झालं सी.ए - Krishna Hanumant Mali

हलाखीची परिस्थिती बदलण्यासाठी गावखेड्यातली अनेक मुलं रात्रंदिवस कष्ट करत असतात. पण सातत्यपूर्ण प्रयत्न करत राहीलं तर यशाला कोणीही रोखू शकत नाही. असच पंढरपूर तालुक्यातील बार्डी (Krishna Hanumant Becames CA ) येथील कृष्णा हनुमंत माळी याने सातत्यपूर्ण प्रयत्न करून चार्टर्ड अकाउंटंटची परीक्षा ( CA Exam Success Story) उत्तीर्ण केली आहे.

Krishna Hanumant Became A  CA
कृष्णा हनुमंत सीए
author img

By

Published : Jul 22, 2022, 3:40 PM IST

पंढरपूर - आपली हलाखीची परिस्थिती बदलण्यासाठी गावखेड्यातली अनेक मुलं रात्रंदिवस कष्ट घेताना दिसतात. त्यात काही जणांना यश येतं, तर काहीजण अपयशाने खचूनही जातात. मात्र सातत्यपूर्ण प्रयत्न करत राहीलं तर यशाला कोणीही रोखू शकत नाही. याचं एक उत्तम उदाहरण समोर आलं आहे. पंढरपूर तालुक्यातील बार्डी ( Pandharpur Taluka Bardi ) येथील कृष्णा हनुमंत माळी याने नुकतीच सीए ( CA Exam Success Story) म्हणजे बँकिंग क्षेत्रातली सर्वात मोठी चार्टर्ड अकाउंटंट ही परीक्षा ( Chartered Accountant Exam ) उत्तीर्ण केली आहे. कृष्णाचे प्राथमिक शिक्षण बार्डी येथील त्याच्या राहत्या गावीच झाले. नंतर भोसे व करकंब येथे माध्यमिक शिक्षण तर महाविद्यालयिन शिक्षण पुणे येथून पूर्ण केले आहे.

कष्ट आणि आत्मविश्वासाच्या जोरावर शेतकऱ्याचं पोरगं झालं सी.ए

पदवीचे शिक्षण घेत असतानाच सीएची पूर्वतयारी - कृष्णाचं उच्च माध्यमिक शिक्षण हे पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय ( Karmaveer Bhaurao Patil College ) येथे झाले. नंतर पुण्यात पदवीचे शिक्षण घेत असताना त्याने 'सीए'ची पूर्वतायरीही सुरू केली होती. सीए होण्याच्या या प्रयत्नात कृष्णाला तीन वेळा अपयशालाही सामोरं जावे लागले. मात्र तो खचला नाही. त्याच्या ध्येयापासून तो किंचीतही दूर गेला नाही. अपयश आलं की काही दिवस गावाकडं राहणं, शेतात रमनं आणि पुन्हा जिद्दीनं तयारीला लागणं ही त्याची सवय होती.

शेतकऱ्याचा मुलगा झाला सीए - कृष्णाचे आईवडील शेतकरीच आहेत. त्यांनी शेतात घाम गाळत कृष्णाच्या उज्वल भविष्याची स्वप्ने रंगवली. कष्ट आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कृष्णानं आपल्या शेतकरी आई-वडिलांचे स्वप्न साकार केले आहे. नात्यांची ताटातूट सुरू असलेल्या काळात कृष्णा अजूनही एकत्र कुटुंब पध्द्तीत राहतो. त्यामुळे घरातील सगळेजण त्याच्या या यशाबद्दल अभिमान व्यक्त करत आहेत. कृष्णा पुढील काही दिवस खाजगी कंपनी मध्ये नौकरी करणार आहे आणि नंतर आपल्या गावाकडे तो स्वतःचा व्यवसाय सुरू करणार आहे. असे ई टिव्ही च्या प्रतिनिधी शी बोलताना त्यांना सांगितले.

आपण मनापासून ठरवलं तर गावखेड्यात म्हशींच्या मागं धावणारं पोरगं मोठ्या पदावर जाऊन बसू शकतं, हे कृष्णानं दाखवून दिले.त्याचे यश हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणादायी ठरत आहे. - कृष्णा माळी,बार्डी,सी.ए.परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी.

हेही वाचा : Ranjitsinh disale : डिसले गुरुजींची राज्यस्तरीय चौकशी! राज्य शिक्षण सचिव व आयुक्तांकडून होणार चौकशी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.