पंढरपूर - वैष्णवांचे आराध्य दैवत असणाऱ्या विठुरायाच्या चरणी एक कोटीचे गुप्तदान भाविकाकडून करण्यात आले आहे. गुप्त दान केलेल्या मुंबई येथील कुटुंबाकडून विठ्ठल मंदिर समितीकडे नाव गुप्त ठेवण्याची विनंती केली आहे. या कुटुंबातील एका व्यक्तीचे कोरोनामुळे निधन झाले होते. त्या व्यक्तीला विमा कंपनीकडून जी काही रक्कम जमा झाली होती. ती रक्कम विठ्ठल मंदिर समितीच्या दानपेटीत अर्पण करण्यात आली आहे.
कुटुंबाने विम्याची रक्कम केली दान
सावळा विठूराया हा गरिबांचा देव म्हणून प्रसिद्ध आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये विठुरायाचे मंदिर लॉक अनलॉक पद्धतीने चालू ठेवण्यात आले आहे. विठ्ठल मंदिर बंद असले तरी विठुरायाच्या चरणी येणारे दान हे कोटी रुपयांमध्ये आहे. मुंबई येथील एका विठ्ठल भक्ताचे कोरोनामुळे निधन झाले होते. त्याच विठ्ठल भक्ताच्या नावाने असणाऱ्या इन्शुरन्सचे पैसे आले होते. ते सर्व पैसे कुटुंबातील सदस्यांनी मंदिराला गुप्त पद्धतीने दान केले आहे. त्याबद्दल कुटुंबाकडून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला नावाचा उल्लेख न करण्याची विनंती केली होती. त्यामुळे कुटुंबाकडून विम्याचे एक कोटी रुपये विठ्ठला चरणी गुप्त पद्धतीने दान केले आहे.
विठूरायाच्या दान पेटीत मोठी घट
सावळ्या विठुरायाचे मंदिर कोरोना दुसऱ्या लाटेमुळे 5 एप्रिल पासून भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे विठूरायाच्या दान पेटीमध्ये मोठी घट झाली आहे. गेल्या सोळा महिन्यापासून विठुरायाच्या उत्पन्नामध्ये मोठी घट झाली आहे. त्यातच मंदिर समितीकडून कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये विविध उपक्रमही राबविण्यात आले आहेत. विठ्ठल मंदिर समितीकडून ऑनलाइन पद्धतीचे दानही स्वीकारले जाते.
कामिनी एकादशीमुळे भाविकांची गर्दी
पांडुरंगाची मंदिर गेल्या तीन महिन्यापासून भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. त्यातच विठूरायाच्या आषाढी एकादशी सोहळा ही प्रातिनिधिक स्वरूपाचा करण्यात आला होता. आषाढी एकादशी नंतर कामिनी एकादशीला भाविकांनी पंढरपुरात एकच गर्दी केली आहे. त्यामुळे विठुरायाची नगरी भाविकांनी फुल याचे चित्र दिसून आले. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर भाविकांनी गजबजून गेला होता.
हेही वाचा - काय होते कलम 370, रद्द झाल्याने जम्मू काश्मीरमध्ये काय बदल झाले?