ETV Bharat / city

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संतापाची लाट; सोमैयांच्या ताफ्यासमोर निदर्शने

author img

By

Published : Oct 17, 2021, 5:29 PM IST

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर भाजप नेते किरीट सोमैया यांनी टीका केल्याच्या निषेधार्थ सोलापुरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाहनाच्या ताफ्यासमोर निदर्शने केली.

म

सोलापूर - राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर भाजप नेते किरीट सोमैया यांनी टीका केल्याच्या निषेधार्थ सोलापुरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाहनाच्या ताफ्यासमोर निदर्शने केली.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संतापाची लाट

सोमैया रविवारी (दि. 17) सोलापूर शहर व सांगोला दौऱ्यावर आहेत सोलापूर शहर येथील भाजप कार्यकर्त्यांसोबत चर्चा करुन त्यांना मार्गदर्शन करुन किरीट सोमैया हे पत्रकार परिषदेनंतर ते जेवणासाठी होटगी रस्त्यावर एका हॉटेलात गेले होते. जेवण करुन परतताना वाटेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्यासमोर निदर्शने केली.

सोमैयांनी दिले शरद पवारांना आव्हान

अजित पवारांच्या बहिणी जरंडेश्वर साखर कारखान्यात भागीदार आहेत. याबाबतचे पुरावे मी ईडीला पाठवणार आहे. शरद पवार यांनी हे खोटं आहे, असे सिद्ध करून दाखवावे, असे आव्हान किरीट सोमैया यांनी पत्रकार परिषदेत केले.

भाजपच्या माजी सहकार मंत्र्याने सोलापुरात बांधले बेकायदेशीर घर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी किरीट सोमैया विरोधात जोरदार निदर्शने केली. तसेच सोलापुरातील भाजपचे विद्यमान आमदार व माजी सहकार मंत्री यांनी सोलापुरातील मुख्य रस्त्यावर बेकायदेशीररित्या घर बांधले आहे. किरीट सोमैया त्यावर का बोलत नाहीत. हे घर बांधताना मोठा भ्रष्टाचार झाला आहे, यावर किरीट सोमैया यांनी बोलायला पाहिजे, अशी टीका केली..

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संतापाची लाट

भाजप नेते किरीट सोमैया यांनी सोलापूर शहरातील शांती सागर मंगल कार्यालय येथे शरद पवार, अजित पवार, रोहित पवार, पार्थ पवार, सुप्रिया सुळे यांवर सडकून टीका केली. या टिकेनंतर सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून सोलापूर शहर पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता. मात्र, होटगी रोड येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अचानकपणे निदर्शने करत ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एकही पोलीस कर्मचारी किंवा अधिकारी त्याठिकाणी उपस्थित नव्हता.

हेही वाचा - अजित पवारांच्या बहिणी 'जरंडेश्वर'मध्ये भागीदार; शरद पवारांना किरीट सोमैयांचे खुले आव्हान, म्हणाले..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.