ETV Bharat / city

लॉकडाऊनऐवजी उपचारावर अधिक भर देण्याची आडम यांची मागणी - solapur corona situation

कोरोना महामारीची दुसरी लाट आली आहे. सोलापूरसह राज्यात कोरोनारुग्णांची संख्या वाढू लागली आहे. प्रशासनाने लॉकडाऊनऐवजी उपचारावर अधिक भर द्यावा, असा सल्लादेखील आडम मास्तर यांनी यावेळी बोलताना दिला.

नरसय्या आडम
नरसय्या आडम
author img

By

Published : Apr 2, 2021, 7:53 PM IST

Updated : Apr 2, 2021, 8:05 PM IST

सोलापूर - कामगार वर्गांचे हित पाहता लॉकडाऊन नको, उपचारावर अधिक भर द्या. स्थानिक प्रशासनाने लॉकडाऊनसारखे निर्णय सोलापूर शहर आणि जिल्ह्यासाठी घेतील तर आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहणार नाही. जोपर्यंत लॉकडाऊन असेल तोपर्यंत रस्त्यावर राहू, असा इशारा माजी आमदार व माकपा नेते नसरय्या आडम यांनी दिला आहे. कोरोना महामारीची दुसरी लाट आली आहे. सोलापूरसह राज्यात कोरोनारुग्णांची संख्या वाढू लागली आहे. प्रशासनाने लॉकडाऊनऐवजी उपचारावर अधिक भर द्यावा, असा सल्लादेखील आडम मास्तर यांनी यावेळी बोलताना दिला.

'सर्वात जास्त फटका कामगार वर्गाला'

सोलापूर शहरात विडी कामगार, टेक्सटाइल कामगार, असंघटित कामगार असे अनेक प्रकारचे महिला व पुरुष कामगार मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. गेल्या वर्षी केंद्र सरकारने देशभरात एकाच वेळी लॉकडाऊन लागू केले होते. गेल्या वर्षी लॉकडाऊनचा सर्वात जास्त फटका कामगार वर्गाला बसला आहे. जवळपास सोलापूर शहरातील दोन लाख कामगारांना याची झळ बसली आहे. विडी कामगार, टेक्सटाइल कामगार यावर अत्यंत हलाखीचे जीवन जगण्याची वेळ आली होती. गेल्या वर्षी झालेल्या लॉकडाऊनमधून कामगार कसेबसे बाहेर पडत आहेत. वाढती रुग्ण संख्या पाहून आणखी लॉकडाऊनसारखे निर्णय झाल्यास याचा तीव्र स्वरूपात विरोध केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

'उपचारावर अधिक भर द्यावा'

सोलापूर शहर व जिल्हा आरोग्य विभागाने वाढत्या कोरोना रुग्णांचा उगीच बाऊ करू नये. शहर आणि जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपचारावर अधिक भर द्यावे. गर्दी होऊ नये यासाठी उपाय योजावेत, असे ते म्हणाले.

'शहरात दहा कोरोना रुग्णांचा मृत्यू'

सोलापूर शहरात गेल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्या वाढत चालली आहे. आज शुक्रवारी 2429 जणांचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामधून 308 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. तर 10 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आज शुक्रवारी आढळलेल्या 308 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 157 पुरुष आणि 151 स्त्रीयांचा समावेश आहे. 133 रुग्ण उपचार घेऊन बरे होऊन घरी परतले आहेत. शहरात 2924 अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Last Updated : Apr 2, 2021, 8:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.