ETV Bharat / city

सोलापुरात कोरोनाचा विस्फोट; गुरुवारी आढळले 2242 रुग्ण

शहर आणि जिल्ह्यातील तब्बल 42 रुग्णांचा कोरोना विषाणूने बळी घेतला आहे. सोलापूर ग्रामीणमध्ये गुरुवारी 764 तर, शहरात 437 असे एकूण 1201 रुग्ण बरे झाले आहेत.

सोलापुरात कोरोनाचा विस्फोट
सोलापुरात कोरोनाचा विस्फोट
author img

By

Published : Apr 30, 2021, 8:29 AM IST

सोलापूर - शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागला आहे. गुरुवारी शहर आणि जिल्ह्यात एकूण 2242 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. तर शहर आणि जिल्ह्यातील तब्बल 42 रुग्णांचा कोरोना विषाणूने बळी घेतला आहे. सोलापूर ग्रामीणमध्ये गुरुवारी 764 तर, शहरात 437 असे एकूण 1201 रुग्ण बरे झाले आहेत.

सोलापूर ग्रामीण भागातील आढावा-

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 12768 जणांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 2041 जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. गुरुवारी 764 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 21 रुग्णांनी कोरोना आजाराशी झगडत प्राण सोडला.

सोलापूर जिल्ह्यातील विविध रुग्णालयात 12 हजार 768 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात सर्वाधिक रुग्ण पंढरपूर येथे (462) आढळले आहेत. माळशिरस येथे 255 रुग्ण, माढा 237, बार्शी 231, मोहोळ 195 तर करमाळा 165, मंगळवेढा 159, सांगोला 153 या तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत.

सोलापुरात कोरोनाचा विस्फोट
सोलापुरात कोरोनाचा विस्फोट

सोलापूर शहर कोरोनाचा आढावा-

सोलापूर शहरात 2518 नागरिकांची तपासणी करण्यात आली होती. यामध्ये 181 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. यामध्ये 104 पुरुष, तर 77 स्त्रियांचा समावेश आहे. सोलापूर शहरात गुरुवारी दिवसभरात 21 रुग्णांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला. यामध्ये 8 पुरुष 13 महिला आहेत.

सोलापूर शहरातील विविध रुग्णालयात 437 जणांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. सोलापूर शहरात आजही 2804 रुग्ण सक्रिय आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.