ETV Bharat / city

सोलापुरात गुरुवारी आढळले 2117 कोरोनाबाधित; 53 रुग्णांचा मृत्यू

author img

By

Published : May 7, 2021, 7:11 AM IST

गुरुवारी सोलापूर शहरात आणि जिल्ह्यात एकूण 2117 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. तब्बल 53 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे हतबल झालेल्या प्रशासनाने निर्बंध अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला आहे.

सोलापुरात गुरुवारी आढळले 2117 कोरोनाबाधित

सोलापूर- शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढतच आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आता प्रशासनाने 8 मे पासून सात दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी सोलापूर शहरात आणि जिल्ह्यात एकूण 2117 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. तब्बल 53 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे हतबल झालेल्या प्रशासनाने निर्बंध अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला आहे.

सोलापूर शहरात 180 जणांना कोरोनाची बाधा, तर 15 मृत्यू-

सोलापूर शहरात गुरुवारी 2316 जणांची तपासणी करण्यात आली. तपासणी केलेल्यामध्ये 180 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. यामध्ये 104 पुरुष व 76 स्त्रिया आहेत. सोलापूर शहरात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 15 पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये 8 पुरुष व 7 स्त्रियांचा समावेश आहे. तर दुसरीकडे दिलासादायक म्हणजे लागण झालेल्या रुग्णांपेक्षा रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहेत. गुरुवारी 328 जण कोरोना आजारावर मात करून घरी परतले आहेत.

सोलापूर ग्रामीण भागात 1937 बाधित, 37 मृत्यू-

सोलापूरच्या ग्रामीण भागात कोरोना महामारीने हाहाकार माजवला आहे. गुरुवारी सोलापुरातील ग्रामीण भागात आरोग्य प्रशासनाने 7259 जणांची तपासणी केली. त्यामध्ये 1937 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह आलेल्यामध्ये 1126 पुरुष आणि 811 स्त्रिया आहेत. 37 पॉझिटिव्ह रुग्णांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. मृत झालेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 25 पुरुष व 13 स्त्रीया आहेत. गुरुवारी पंढरपूर येथे 442 रुग्ण आढळले आहेत. तर माळशिरस 407 रुग्ण, सांगोला 206 रुग्ण,करमाळा 204 रुग्ण, माढा 166 रुग्ण या तालुक्यात सर्वाधिक रुग्ण वाढले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.