ETV Bharat / city

सोलापुरात रविवारी 2253 नवीन रुग्णांची भर; तर 44 कोरोनाबाधितांचा मृत्यू

author img

By

Published : May 17, 2021, 7:26 AM IST

सोलापूर शहर आणि जिल्ह्यात सध्या एकूण 17120 इतके अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रविवारी पहिल्यांदाच सोलापूर शहरातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 1 हजाराच्या खाली म्हणजे 972 इतकी झाली आहे.

solapur news
सोलापूर कोरोना रुग्णसंख्या

सोलापूर - शहर आणि जिल्ह्यात रविवारी एकूण 2766 रुग्णांनी उपचाराअंती कोरोनावर मात केली. तर शहर आणि जिल्ह्यात 2253 नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. मात्र, रविवारी जिल्ह्यात तब्बल 44 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सोलापूर शहर आणि जिल्ह्यात सध्या एकूण 17120 इतके अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रविवारी पहिल्यांदाच सोलापूर शहरातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 1 हजाराच्या खाली म्हणजे 972 इतकी झाली आहे.

सोलापूर ग्रामीण अहवाल

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 6781 जणांची तपासणी करण्यात आली. त्यामधून 2184 जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल रविवारी प्राप्त झाला आहे. या नवीन बाधितांच्या संख्येने प्रशासनाची पुन्हा एकदा झोप उडवली आहे. दिलासादायक म्हणजे रविवारी ग्रामीण भागात 2546 रुग्ण बरे झाले आहेत. ग्रामीण भागात रविवारी 37 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर ग्रामीण भागात आजही 16148 रुग्ण अॅक्टिव्ह असून विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.

सोलापूर शहर अहवाल-

सोलापूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत आहे. सोलापूर महानगरपालिका आरोग्य प्रशासनाने 1709 जणांची तपासणी केली. त्यामधून 69 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. तर सोलापूर शहरात रविवारी 220 जणांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. सोलापूर शहरातील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर शहरात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या हळूहळू कमी होत आहे. रविवारी आलेल्या अहवालात फक्त 972 अॅक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या दोन महिन्यांत पहिल्यांदाच हजारच्या खाली अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या गेली आहे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.