ETV Bharat / city

महाविकास आघाडी सरकारचा पापाचा घडा भरला - आमदार सुभाष देशमुख

राज्यातील सर्व मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी भाजपच्यावतीने महाराष्ट्रभर घंटानाद आंदोलन करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बाळीवेस येथील मल्लिकार्जुन मंदिर येथे घंटानाद आंदोलन करण्यात आले.

author img

By

Published : Aug 30, 2021, 6:06 PM IST

Updated : Aug 30, 2021, 7:11 PM IST

MLA Subhash Deshmukh
आमदार सुभाष देशमुख

सोलापूर - तीन तिघाडा आणि काम बिघाडा अशी परिस्थिती महाविकास आघाडी सरकार आल्यापासून राज्याची झाली आहे. एकीकडे दारू दुकाने, बिअरबार सुरू आहेत. यातून शासन कोट्यवधींची माया गोळा करत आहे. मात्र, दुसरीकडे देवाला भेटण्यासाठी जनता आतूर झाली असतानाही मंदिर बंद करण्याचे पाप या शासनाकडून सुरू आहे. या सरकारचा पापाचा घडा भरला असून, आता जनता या सरकारला त्यांची जागा दाखवेल, असे प्रतिपादन आमदार सुभाष देशमुख यांनी केले आहे.

आमदार सुभाष देशमुख यांची राज्य सरकारवर टीका

राज्यातील सर्व मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी भाजपच्यावतीने महाराष्ट्रभर घंटानाद आंदोलन करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बाळीवेस येथील मल्लिकार्जुन मंदिर येथे घंटानाद आंदोलन करण्यात आले. त्यावेळी आमदार देशमुख बोलत होते. यावेळी आंदोलनात शहराध्यक्ष विक्रम देशमुख, महापौर श्रीकांचना यन्नम, माजी महापौर शोभा बनशेट्टी आदी उपस्थित होते.

कोरोना काळात दारूचे दुकाने सुरु मात्र मंदिरे बंद-

कोरोना महामारीचे संकट संपूर्ण देशावर आले आहे. राज्यात फार भयानक परिस्थिती आहे. ही परिस्थिती हाताळण्यात महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरले आहे. सर्व बिअरबार, दारू दुकाने सुरू करून सरकार वसुली करण्याच्या नादात आहे. त्यांना सामान्य जनतेची कोणतीही पर्वा नाही. सध्या भक्तगण देवाला भेटण्यासाठी आतूर झालेले आहेत. मात्र, त्यांना देवापासून लांब ठेवण्याचे पाप या सरकारकडून सुरू आहे. याचा निषेध म्हणून भाजपतर्फे घंटानाद आंदोलन करण्यात येत आहे. हा घंटानाद ऐकून तरी या शासनाला मंदिर उघडण्याची बुद्धी येईल, असेही आमदार देशमुख म्हणाले. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी उद्धवा धुंद तुझे सरकार अशी घोषणाबाजी केली. या आंदोलनात नगरसेविका राजश्री चव्हाण, बिज्जू प्रधाने, शशी थोरात, महेश देवकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवसेनेने हिंदुत्व गुंडाळले-

मंदिर अद्यापही बंद ठेवून शिवसेनेने हिंदुत्व गुंडाळून ठेवल्याचे सिद्ध होत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर ते हिंदुत्व सोडूनच सरकारमध्ये गेले आहेत. त्यांना जनता निश्चितच धडा शिकवेल, अशी टीका आमदार देशमुख यांनी शिवसेनेवर केली.

हेही वाचा - जळगावात एकनाथ खडसे भाजपवर बरसले; ईडी चौकशीच्या मुद्द्यावरून व्यक्त केली मनातील खदखद!

Last Updated : Aug 30, 2021, 7:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.