सोलापूर - सकल मराठा समाजाच्यावतीने खासदार जय सिद्धेश्वर महाराज यांच्या मठासमोर व आमदार आमदार प्रणिती शिंदे यांच्या घरासमोर आसूड ओढो आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते. खासदार यांच्या वतीने नगरसेवक रमणशेट्टी यांनी मराठा समाजाचे निवेदन स्वीकारले तर आमदार प्रणिती शिंदे यांनी स्वतः निवेदन स्वीकारले.
शेळगी परिसरात खासदार जय सिद्धेश्वर महाराज यांचे मठ आहे. सकाळी 11 वाजण्याच्याच्या सुमारास शेळगी परिसरसतील मराठा बांधवांचा मोठा जनसमुदायाने पुलाखाली जमून जोरदार घोषणाबाजी केली. काही वेळाने सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते व पदाधिकारी शेळगी पुलाखाली आले. हलगी वाजवून विविध घोषणा करत खासदारांच्या मठासमोर पोहोचले. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा बंदोबस्तासाठी होता.
मठा समोर आल्यानंतर आसूड ओढो आंदोलनास सुरूवात झाली. माऊली पवार यांनी व सकल मराठा समाजाच्या जनसमुदयाने जोरदार भाषण करत ठिय्या मांडला. मराठा बांधवांच्या उपस्थितीत नगरसेवक रमणशेट्टी यांना निवेदन देत. संसदेत मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
तसेच सकल मराठा समाजाच्या रणरागिणींनी शासकीय विश्रामगृहासमोर आसुड ओढत आंदोलनास सुरुवात केली. त्यानंतर हलगी वाजवत आसूड ओढत हे आंदोलक सोलापूर मध्यचे आमदार प्रणिती शिंदे यांच्या निवासस्थानासमोर पोहोचले. यावेळी विविध घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी स्वतः त्यांची भेट घेत निवेदन स्वीकारले.
तसेच सकल मराठा ठोक मोर्चाच्या वतीने पार्क चौक येथील चार हुतात्मा पुतळ्याजवळ आसूड ओढत आंदोलन केले. यावेळी त्यांनी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्यावर आसूड ओढले. यावेळी फौजदार चावडी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.
हेही वाचा - सोलापुरात मास्कची सक्ती करा - पालकमंत्री दत्तात्रय भरणे