ETV Bharat / city

पुणे शहरात भाजपला सहा, तर राष्ट्रवादीला दोन जागा - pune assembly election live

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वपूर्ण असलेल्या पुणे मतदारसंघात भाजपला शह देण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश आल्याचे चित्र आहे.

पुण्यात भाजपची प्रतिष्ठा पणाला; मतमोजणीला सुरुवात
author img

By

Published : Oct 24, 2019, 8:22 AM IST

Updated : Oct 25, 2019, 7:37 PM IST

पुणे - शहर तसेच ग्रामीण भागातून मतदान मोजणी पूर्ण झाली असून, शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी सहा भाजप तसेच दोन जागा राष्ट्रवादीला मिळाल्या आहेत.

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वपूर्ण असलेल्या पुणे मतदारसंघात भाजपला शह देण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश आल्याचे चित्र आहे.

LIVE UPDATES :

  • दौंड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे राहूल कुल विजयी
  • पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून सुनील कांबळे 5000 मतांनी विजयी; काँग्रेसचे रमेश बागवे पराभूत
  • इंदापूर मतदारसंघात राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणेंचा हर्षवर्धन पाटलांवर 3207 मतांनी विजय
  • मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीच्या सुनील शेळके यांनी संजय भेगडेंचा पराभव केला
  • शिवाजीनगर मतदारसंघातून भाजपचे सिध्दार्थ शिरोळे विजयी
  • भाजपच्या माधुरी मिसाळ यांचा पर्वती मतदारसंघातून विजय निश्चित
  • पुरंदरमध्ये शिवसेनेचे मंत्री विजय शिवतारे यांचा पराभव
  • खेड आळंदीमध्ये राष्ट्रवादीचे दिलीप मोहिते विजयी
  • चौदाव्या फेरीत भाजपचे राहुल कुल 5286 मतांनी आघाडीवर
  • बारामती मतदारसमंघातून राष्ट्रवादीचे अजित पवार यांचा एक लाखाहून अधिक मताधिक्याने विजय झाला आहे.
  • राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे यांचा आंबेगाव मतदारसंघातून 67815 मतांनी विजयी
  • वडगाव शेरी मध्ये सुनील टिंगरे आघाडीवर
  • कसबा मतदारसंघातून भाजपच्या मुक्ता टिळक विजयी
  • कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील यांच्याकडे 3000 मतांचे लीड
  • हडपसरमधून राष्ट्रवादीचे चेतन तुपे विजयी; भाजपला धक्का
  • आंबेगावमध्ये राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे यांना 40000चे लीड
  • शिरूरमधून राष्ट्रवादीचे अशोक पवारांना 5000चे लीड
  • जुन्नर मतदारसंघात अतुल बेनके यांची 4500 मतांनी आघाडी
  • कसब्यात मुक्ता टिळक यांना 56970 मतदान ; आघाडी कायम
  • सोळावी फेरी : खडकवासला मतदारसंघात भाजपच्या भीमराव तापकीर यांची मुसंडी; 6000 मतांची आघाडी
  • दौंडमध्ये भाजपच्या राहूल कुल यांची 6845 आघाडी
  • सहाव्या फेरीअखेर हर्षवर्धन पाटील 4028 मतांनी पिछाडीवर
  • कसबा मतदारसंघातून भाजपच्या मुक्ता टिळक यांना २१००० चे लीड
  • पर्वती मतदारसंघात पाचव्या फेरीअखेर भाजपच्या माधुरी मिसळ यांची ६८९९ मतांनी आघाडी
  • अजित पवारांना बारामतीतून 63,908 मतांची आघाडी
  • खडकवासला : राष्ट्रवादीचे सचिन दोडके 52427 तर भाजपचे भीमराव तापकीर 49038
  • इंदापूरात हर्षवर्धन पाटील 2750 मतांनी पिछाडीवर
  • पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये मतमोजणी थांबली; ईव्हीएम मशीनवर सील नसल्याने काँग्रेसचा आक्षेप
  • आठव्या फेरीअखेर अजित पवार पन्नास हजार 360 मतांनी आघाडीवर
  • हडपसर मतदारसंघात नवव्या फेरीअखेर योगेश टिळेकर यांची 49005 मतांनी आघाडी
  • अजित पवार सहाव्या फेरीअखेर 35578 मतांनी आघाडीवर
  • कसबा मतदारसंघातून भाजपच्या मुक्ता टिळक यांना 21270 मतदान; सध्या आघाडी कायम
  • मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीचे शेळके यांची तिसऱया फेरीअखेर 8000 मतांनी आघाडी
  • खडकवासला मतदारसंघात राष्ट्रवादीचे सचिन दोडके यांची पाचव्या फेरीअखेर ११००० मतांनी आघाडी
    बारामतीमध्ये अजित पवार चौथ्या फेरीअखेर 25 हजार 552 मतांनी आघाडीवर
  • इंदापूर : दुसरी फेरी - हर्षवर्धन पाटील 10804 तर राष्ट्रवादीला 9750
  • बारामती : दुसऱ्या फेरीत अजित पवारांना 14701 तर पडळकरांना 2470
  • इंदापूरात हर्षवर्धन पाटील यांना पहिल्या फेरीत 5253 तर दत्तात्रय भरणे यांना 4440
  • पहिल्या फेरीत अजित पवारांना 7467 मतदान ; तर गोपीचंद पडळकर यांना 872 मतदान
  • जिल्ह्यातील बारामती मतदारसंघातून अजित पवार पहिल्या फेरीत 6300 मतांनी आघाडीवर आहेत.

21 तारखेला मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर आता सर्वत्र निकालाची प्रतीक्षा आहे. यंदा संपूर्ण जिल्ह्यात 57.74 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात महत्वपूर्ण असलेल्या पुणे मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपच्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना डावलून पक्षाने प्रदेशाध्यक्षांना भाजपचे 'सेफ सीट' असलेल्या कोथरूड मतदारसंघातून उमेदवारी दिली आणि सर्व राज्याचे लक्ष या मतदारसंघाकडे लागले. चंद्रकांत पाटील यांनी जरी निवडून येण्याचा दावा केला असला, तरीही मनसेच्या स्थानिक उमेदवाराविरोधात एकवटलेली विरोधकांची ताकद प्रदेशाध्यक्षांनी जड जाऊ शकते.

जिल्ह्यात एकूण 21 मतदारसंघ असून, यामध्ये 8 मतदारसंघ शहर हद्दीत येतात. यामध्ये पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघ राखीव असून, यामधून विद्यमान भाजपचे आमदार दिलीप कांबळे यांची प्रतिष्ठा पुन्हा पणाला आहे.

शहरातील आठ मतदारसंघांमधील आठही जागी भाजपने शिवसेनेला डावलून स्वतःच्या पक्षातील उमेदवारांना तिकीट जाहीर केल्याने काही ठिकाणी शिवसेनेच्या गोटात नाराजी होती. याचाही फटका भाजपला बसू शकतो.

कसबा मतदारसंघात याआधी पालकमंत्री गिरीश बापट 5 वेळा विधानसभेवर गेले आहेत. यंदा ते खासदार झाल्याने या जागी महापौर मुक्त टिळक यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. परंतु, भाजपचा पारंपरीक मतदारसंघ असतानाही शिवसेनेचे बंडखोर विशाल धनवडे यांनी मुक्त टिळक यांना आव्हान उभे केल्याने या ठिकाणी चुरस वाढली आहे.

शिवाजीनगर मतदारसंघात विद्यमान आमदार विजय काळे यांना डावलून पक्षाने सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी दिल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यांना काँग्रेसचे दत्ता बहिरट यांच्याकडून आव्हान आहे.

हडपसर

हडपसर मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार योगेश टिळक यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे चेतन तुपे तसेच मनसेकडून वसंत मोरे यांनी कडवी टक्कर दिली आहे.

पर्वती मतदारसंघ

पर्वती मतदारसंघात भाजपने विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांना पुन्हा नशीब अजमावण्याची संधी दिली असून, त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या अश्विनी कदम यांना उमेदवारी आहे.

खडकवासला मतदारसंघ

खडकवासल्यातून भाजपचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर पुन्हा मैदानात असून, राष्ट्रवादीकडून सचिन दोडके यांनी दंड थोपटले आहेत.

कोथरूड

कोथरूडमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पक्षाने उमेदवारी दिली असून, त्यांचा विरोधात मनसेने किशोर शिंदे यांना मैदानात उतरवले आहे.

Intro:Body:

News

Conclusion:
Last Updated : Oct 25, 2019, 7:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.