सोलापूर - जिल्ह्यामध्ये 13 एप्रिलला सकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता. पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार व नारायण चिंचोली या गावातील शेतकऱ्यांच्या द्राक्ष, केळी पिकांचे मोठे नुकसान झाले. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या ईश्वर वठार येथील द्राक्ष बागांची भाजपा नेते प्रवीण दरेकर आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी पाहणी केली आहे.
राज्य सरकारकडून मदतीची अपेक्षा!
कोरोना प्रादुर्भावमुळे गेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांच्या पीक मालाला भाव नाही. त्यात लॉकडाऊनमुळे पिकांचे भाव कोसळले आहे. शेतकऱ्यांना पुराचा मोठा फटका बसला आहे. आता शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे हातात आलेले पीक वाहून गेले आहे. त्यामूळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा आहे.
विरोधीपक्ष नेते दरेकरांची नुकसान पाहणी
पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे पोटनिवडणूक भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर हे दोन दिवस पंढरपूर दौऱ्यावर आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. दरेकर यांनी पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार येथे आप्पासाहेब नागटिळक यांच्या शेतामध्ये जाऊन अवकाळी पावसामुळे झालेल्या द्राक्ष बागायत पिकाची पाहणी केली. नागटिळक यांच्या दोन एकर क्षेत्रामध्ये द्राक्ष बागायत केली होती. द्राक्ष हे तोडणीसाठी आले होते. पण अवकाळी पावसामुळे द्राक्षांचे नुकसान झाले आहे. यावेळी दरेकर यांनी जिल्हाधिकारी शंभरकर यांना फोन करत पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली.
हेही वाचा - 'राज्यातील ऑक्सिजनचा तुटवडा भाभा अणू संशोधन केंद्र दूर करणार'