ETV Bharat / city

Lata Mangeshkar Sang First Classical Song : बालहट्टाने लता मंगेशकरांनी 'या' शहरातून केली गायनाची सुरुवात - लता मंगेशकरांनी 'या' शहरातून केली गायनाची सुरुवात

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी आपल्या गायनाची सुरुवात सोलापुरातून ( Lata Mangeshkar Sang First Classical Song ) केली होती. त्याबाबत खुद्द लता दीदींनी ट्विटरवर माहिती देत सांगितले होते. आपल्या वडिलांसोबत एका कार्यक्रमात त्या सोलापुरात आल्या होत्या. पाहिले शास्त्रीय गीताचे ( Classical Songs of Lata Mangeshkar ) सादरीकरण हे सोलापुरात केले होते. दीनानाथ मंगेशकर ( Deenanath Mangeshkar ) यांसमोर लता दीदींनी हट्ट धरून शास्त्रीय गीत सादरीकरण केले ( Lata Mangeshkar Sang First Song in Solapur ) होते. 9 सप्टेंबर, 1938 साली सरस्वती चौक येथील भागवत चित्रमंदिर येथे हा कार्यक्रम सोहळा संपन्न झाला होता.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Feb 6, 2022, 5:31 PM IST

Updated : Feb 6, 2022, 6:29 PM IST

सोलापूर - गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी आपल्या गायनाची सुरुवात सोलापुरातून ( Lata Mangeshkar Sang First Classical Song ) केली होती. त्याबाबत खुद्द लता दीदींनी ट्विटरवर माहिती देत सांगितले होते. आपल्या वडिलांसोबत एका कार्यक्रमात त्या सोलापुरात आल्या होत्या. पाहिले शास्त्रीय गीताचे ( Classical Songs of Lata Mangeshkar ) सादरीकरण हे सोलापुरात केले होते. दीनानाथ मंगेशकर ( Deenanath Mangeshkar ) यांसमोर लता दीदींनी हट्ट धरून शास्त्रीय गीत सादरीकरण केले ( Lata Mangeshkar Sang First Song in Solapur ) होते. 9 सप्टेंबर, 1938 साली सरस्वती चौक येथील भागवत चित्रमंदिर येथे हा कार्यक्रम सोहळा संपन्न झाला होता.

बोलताना आनंद बदामीकर

स्वतः लता दीदींनी त्यावेळचा फोटो ट्विट करत दिला होता आठवणींना उजाळा - 9 सप्टेंबर, 1938 रोजी दीनानाथ मंगेशकर यांच्या कार्यक्रमाचे आयोजन सोलापुरात करण्यात आले ( Deenanath Mangeshkar in Solapur ) होते. त्यावेळी आयोजकांसोबत होत असलेली चर्चा लता दीदी ऐकल्या होत्या. त्यांनी वडील दीनानाथ मंगेशकरांसमोर मी देखील गीत सादरीकरण करणार असल्याचा हट्ट धरला होता. दीनानाथ मंगेशकर यांनी अजून तू खूप लहान आहेस, मंचावर गाण्यासाठी खूप काही शिकायचे आहे, अशी समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. आयोजकांनीही मास्टर दीनानाथ मंगेशकर यांना लता दीदींनी गीत सादरीकरण करावे, अशी विनंती केली. आयोजकांनी सोलापुरात ' पिता पुत्री का अनोखा जलसा, एक अनोखा शो', अशी जाहिरात केली होती. या कार्यक्रमात लता दीदींनी राग खंबावतीमध्ये एक रचना गायली आणि त्यानंतर वडिलांच्या लोकप्रिय नाटकांपैकी एक गाणेही गायिले. श्रोत्यांनी त्यांच्या त्यांच्या गायनाला भरभरून प्रतिसाद दिला. लता मंगेशकर या थकून वडिलांच्या मांडीवर झोपी गेल्या होत्या.

  • Aaj hamare parichit Upendra Chinchore ji ka phone aaya,unhone mujhe bataaya ki aapne apna pehla classical performance ,pitaji ke saath 9th Sep 1938 ko Solapur mein diya tha. Ye photo us waqt show publicity ke liye kheechwaayi thi.Yaqeen nahi hota ki gaate hue 83 saal hogaye. pic.twitter.com/Fkcpug1pJb

    — Lata Mangeshkar (@mangeshkarlata) March 29, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अक्कलकोटच्या भोसले परिवारासोबत लता मंगेशकर यांचे ऋणानुबंध - लता मंगेशकर आणि अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे ( Shri Swami Samarth Annachatra Mandal ) प्रमुख जन्मेयराजे भोसले यांच्या परिवाराचे अनेक वर्षांपासून ऋणानुबंध होते. 1991 साली जेव्हा लता मंगेशकर सोलापुरात आल्या त्यावेळी त्यांनी आवर्जून अक्कलकोट येथे जाऊन स्वामी समर्थांचे दर्शन घेतले होते. तसेच स्वतः पोळ्या लाटून अन्न छत्र मंडळात सेवा बजावली होती. मीना मंगेशकर ( Meena Mangeshkar ) लिखित मोठी तिची सावली या पुस्तकात जन्मेयराजे भोसले यांचा उल्लेख करत घरातील माणसे, असे संबोधतात.

सोलापूर महानगरपालिकेने देखील सन्मान केला - गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा सोलापूर महानगरपालिकेने तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या हस्ते 15 फेब्रुवारी, 1994 रोजी सन्मान करण्यात आला होता. लतादीदींना मानपत्र देऊन सन्मान करणारी सोलापूर महानगरपालिका ( Solapur Municipal Corporation ) पहिलीच महापालिका आहे. सोलापुरातील पार्क चौक येथे मोठा कार्यक्रम घेऊन शरद पवार यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला होता. पवार यांच्या आग्रहास्तव लता दीदींनी 'मोगरा फुलला' हे गाणं ही गायिले होते.

हेही वाचा - Lata Mangeshkar : नेहरू, क्रिकेट प्रेम, इंदिरा गांधी; फोटोतून जाणून घ्या...लतादीदींच्या आयुष्यातील काही रंजक गोष्टी!

Last Updated : Feb 6, 2022, 6:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.