पंढरपूर - भारतीय संस्कृतीत दसऱ्यानंतर थंडी सुरू होते. मात्र गेल्या अनेक वर्षापासून जागतिक हवामानामध्ये प्रचंड बदल झाला आहे. त्यामुळे हवामानातील बदलते स्वरूप ऋतूंवर झाल्याचे दिसून येते. हिवाळ्यात विविध आजाराना नागरिकांना त्या कारणाने बळी पडतो. यासाठी थंड वातावरणापासून शरीराचे रक्षण व्हावे यासाठी तीळ-गूळ खाल्ले जातात. तीळ उष्ण असल्याने थंडीमध्ये शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. यामुळे थंडीच्या दिवसात तिळ, गुळ, शेंगदाणे, बाजरी यांची मागणी वाढते.
हिवाळ्याच्या दिवसात साधारण दिवसा ऊन व रात्री थंड असे वातावरण असते. साधारण रात्रीच्या सुमारास वातावरणामधील गारठा हा असतो. त्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. त्वचेतील ओलावा कमी झाल्याने त्वचा फुटते व कधीकधी ही त्वचा कोरडी ही पडत असते. शरीरातील उष्णता टिकून राहण्यासाठी जास्त प्रमाणात तीळ आणि गुळ यांचे मिश्रण असणारे पदार्थ खाण्यासाठी पसंती देतात. यामुळे थंडीतही शरीरातील उष्णता टिकून ठेवण्यास मदत होते.
भारतीय संस्कृतीत हिवाळ्यात तिळाच्या पदार्थांचे आवश्यकता
साधारणपणे भारतीय संस्कृती मध्ये दसरा सणानंतर हवेत मध्येच गारठा निर्माण होण्यास सुरुवात होते. हिवाळा ऋतू त्याच महिन्यात सुरू होतो. दिवाळीच्या सणाच्या दिवशी अभ्यंगस्नानाचा उपयोग तीळ, शेंगदाणे, खोबरे यांचा वापर करतात. तर खाण्यासाठी तिळाच्या चटण्या व लाडूचे पदार्थ करून ठेवले जातात. हिवाळ्याच्या मध्यंतरी म्हणजेच मकार संक्रातीच्या सणासुदीच्या काळात भारतीय संस्कृतीत तीळ आणि गूळ यांचे मिश्रण असणारे पदार्थ नागरिकांना वाटण्याची परंपरा आहे. एक दिवसांमध्ये थंडीची मोठी लाट निर्माण होत असते. शरीरातील उष्णता व ऊर्जा टिकवून धरण्यासाठी तिळाच्या पदार्थांना मोठी मागणी असते.
उष्ण पदार्थांना मागणी
भारतीय उपखंडामध्ये चार महिन्याचा हिवाळी ऋतू असतो. यामध्ये नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या महिन्यात थंडीचा कडाका वाढतो. यातूनच बाजारपेठेमध्ये उष्ण पदार्थांना वाढीव मागणी असल्याचे दिसून येते. यामध्ये भरपूर प्रमाणात तीळ व गूळ उष्ण असणाऱ्या पदार्थांना मागणी असते. त्याचबरोबर गुळाचा वापर भरपूर असावा. गाजर, पेरू, बोरे, ऊस खाणे योग्यआहारात असतात. तर लसूण, खोबरे, शेंगदाणा व तिळाच्या चटण्या वापराव्यात. बाजरीची भाकरी उपयुक्त ठरत असते. या दिवसांमध्ये ज्वारी व बाजरी यांची मागणी प्रचंड वाढल्याचे दिसून येते. हिवाळा ऋतु शरीर स्वास्थ्यासाठी उत्तम असल्याने याकाळात व्यायामाला देखील अधिक महत्त्व दिले जाते.
हेही वाचा - हिवाळा सुरू झालाय, 'अशी' घ्या आपल्या त्वचेची काळजी... त्वचारोग तज्ज्ञांची विशेष मुलाखत