ETV Bharat / city

सोलापुरला कोरोनाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आरोग्यमंत्र्यांनी आखला नवा प्लॅन - कोरोनाचा मृत्यू दर सोलापूर न्यूज

रुग्ण संख्येच्या तुलनेत आणि मृत्यूदरात सोलापूर राज्यात अव्वल आहे. सोलापूरच्या आरोग्य विभागा मार्फत विडी, हातमाग व यंत्रमाग आदी कामगार वस्तीतील नागरिकांच्या छातीचा सिटी स्कॅन व एक्स-रे काढण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच अलगीकरण कक्ष वाढविण्यावरही भर दिला जाणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

health minister
राजेश टोपे आरोग्यमंत्री
author img

By

Published : Jun 28, 2020, 8:46 AM IST

सोलापूर - राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याचप्रमाणे सुरुवातीला ग्रीनझोनमध्ये समावेश असलेल्या सोलापूर जिल्ह्यातही कोरोना विषाणूने कहर केला आहे. शहर व जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून आता खुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी यासाठी पुढाकार घेतला आहे. सोलापुरातील मृत्यूदर व कोरोनाचा वाढता संसर्ग कमी करण्यासाठी आरोग्य मंत्र्यांनी मूलमंत्र दिला आहे. त्याची अंमलबजावणी केल्यास सोलापूर कोरोनाच्या विळख्यातून बाहेर येईल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

रुग्ण संख्येच्या तुलनेत आणि मृत्यूदरात सोलापूर राज्यात अव्वल आहे. सोलापूरच्या आरोग्य विभागा मार्फत विडी, हातमाग व यंत्रमाग आदी कामगार वस्तीतील नागरिकांच्या छातीचा सिटी स्कॅन व एक्स-रे काढण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच अलगीकरण कक्ष वाढविण्यावरही भर दिला जाणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आरोग्य मंत्री राजेश टोपे शनिवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील कोरोना महामारीचा आढावा घेऊन पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपायोजनाबाबत सविस्तर माहिती सांगितली.

यामुळे लवकर सापडतील रुग्ण..

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बेडची संख्या वाढविली जाणार असून अलगीकरण कक्ष वाढवण्यासाठी शासकीय इमारती अथवा शाळा, वस्तीगृहांचा अधिकाअधिक वापर केला जाणार आहे. इलाइझा अँटी बॉडी टेस्टवर भर दिला जाणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालयातही कोरोना रुग्णावर उपचाराची सोय उपलब्ध केली जाणार आहे. निमोनियासह अन्य आजार वेळेत निदान व्हावे, त्यांवर वेळेत उपचार व्हावे यासाठी पोर्टेबल मशिनद्वारे एक्स- रे काढले जाणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी यावेळी दिली. सोलापूर येथील मृत्यू दर 11 टक्के असून हे प्रमाण राज्यात सर्वाधिक आहे.

अन्यथा खासगी हॉस्पिटलवर बॉम्बे नर्सिंग अॅक्ट नुसार कारवाई

आता पावसाळ्यात साथीचे आजार वाढण्याची शक्यता आहे. राज्यसरकार चे आदेश खासगी दाखान्याना मान्य करायलाच हवे अन्यथा त्यांवर बॉम्बे नर्सिंग अॅक्ट नुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली. तसेच संबंधित दवाखान्याचा व डॉक्टरचा परवाना रद्द केला जाणार असल्याचं इशारा यावेळी पत्रकार परिषदेत देण्यात आला. खासगी दवाखाने सुरू आहेत की नाहीत व तेथे रुग्णांवर उपचार केले जात आहेत की नाही? यावर लक्ष देण्यासाठी स्वतंत्र पथक नियुक्त केले जाणार असल्याची माहिती टोपे यांनी यावेळी दिली.

सोलापूर महानगर पालिका हद्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. शनिवारी महापालिका हद्दीत ५७ नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर ४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. या आकडेवारीसह सोलापुरात एकूण 2141 इतके कोरोनाबाधित रुग्णसंख्या झाली आहे. त्यापैकी 767 अॅक्टिव्ह केसेस आहेत.तर एकूण २३८ जणांचा मृत्यू झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.