सोलापूर - वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आज(दि.१२ऑगस्ट) ला सोलापूरात ईव्हीएम मशीन विरोधात आंदोलन केले. परंतू, हे आंदोलन म्हणजे बनाव असल्याचं उघड झाल्यावर स्थानिक नगरसेवकाचा हशा झालाय.
यावेळी त्यांनी हे भाजपचे षडयंत्र असल्याचा आरोप केला. तसेच प्रकाश आंबेडकर यांचे कारण देऊन बझार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवणार असल्याचे सांगितले.
दरम्यान, या आंदोलनाची कल्पना स्थानिक प्रशासन आणि पोलिसांना आली. त्यांनी ट्रकसोबतच उपस्थित असणाऱ्या आणि विश्राम गृहात थांबलेल्या प्रांत अधिकारी प्रमोद गायकवाड यांच्याशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी स्वतः घटनास्थळावर येऊन संपूर्ण राज्यातून या मशिन्स निवडणूक आयोगाकडे जमा करण्यात येत असल्याची माहिती दिली.
हे कळताच खोट्या आंदोलनाचा आव आणणाऱ्यांनी हे आंदोलन गुन्हा न दाखल करताच गुंडाळले.