पंढरपूर - माजी मंत्री गणपतराव देशमुख यांच्या नावाने ग्रामीण भागातील योजनेला त्यांचे नाव देण्याची सर्वसामान्य जनतेची मागणी आहे. ग्रामीण भागातील रोजगार हमी योजने बाबत गणपत आबा देशमुख यांचे काम आदर्शवाद आहे. याबाबत महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख नेत्यांसमोर नावा बाबतचा प्रस्ताव देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी आज सांगोला येथे गणपतराव देशमुख यांची यांच्या कुटुंबांची सांत्वनपर भेट घेतली. राज्य सरकारच्या वतीने राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी देशमुख कुटुंबाची भेट घेतली. त्यांचे सुपुत्र बाबासाहेब देशमुख यांच्या जवळ आबासाहेबांच्या आठवणींना उजाळा ही दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा यांच्याकडून गणपत देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
दहा वर्षे विधानसभेत काम करण्याची संधी
2004 साली पहिल्यांदा आमदार म्हणून विधानसभेत निवडून गेलो. त्यावेळी गणपत आबा देशमुख यांची भेट झाली होती. त्यांच्या अनुभवाचा फायदा माझ्यासह अनेक नवीन आमदारांनाही झाला आहे. दहा वर्ष विधानसभेच्या कामकाजामध्ये आम्ही सक्रिय सहभागही घेतला होता. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यांची कामाची पद्धत ही शिकण्यासारखी होती असे प्रतिपादन शंभूराजे देसाई यांनी केले.
हेही वाचा - आता व्हॉट्सअॅपद्वारे काही सेकंदातच मिळणार कोरोना लसीकरण प्रमाणपत्र; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती